एक्स्प्लोर
Honesty First: 'हार कचऱ्यात गेला', महिलेच्या तक्रारीनंतर KDMC कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून सोनं शोधून काढलं!
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेला तिचा हरवलेला सोन्याचा हार परत मिळाला आहे. स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव (Amit Bhalerao) आणि त्यांच्या टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली. 'आपण सोन्याचा हार नजरचुकीनं कचऱ्याच्या पिशवीत टाकला', अशी तक्रार एका महिलेने केल्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. कल्याण पूर्वमधून गोळा केलेला कचरा कचोरे येथील केंद्रावर पाठवण्यात आला होता. तक्रारदार महिला, तिचे कुटुंबिय आणि अधिकाऱ्यांच्या साक्षीने संबंधित कचऱ्याची गाडी शोधून त्यातील कचरा वेगळा करण्यात आला. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोध घेतल्यानंतर अखेर तो सोन्याचा हार सापडला आणि महिलेला परत करण्यात आला. सोन्याचे भाव वाढत असताना कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























