(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : न घाबरता तुरुंगवास पत्करला, यांना काय घाबरायचं! हक्कभंगावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर त्याचे पडसाद अधिवेशनात उमटले. माझ्या भावना समजू घेतल्या पाहिजेत, बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई केली जात असल्याचे ते म्हणाले..
Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला उद्देशून चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर त्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात हक्कभंग (breach of privilege motion against sanjay raut) आणण्याची मागणी केली. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या भावना समजू घेतल्या पाहिजेत, बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई केली जात आहे," ते म्हणाले. देशातील सभागृहाचा आदर केला असल्याचे त्यांनी सांगितले.
'राज्यातील अनेक प्रश्नांवर लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतला टार्गेट'
त्यांनी सांगितले की, "चोरांवर संस्कार नसतात, काय अपेक्षा करायची? कुणाची धिंड निघते ते पाहू. मी माझ्या पक्षाचा नेता आहे. न घाबरता तुरुंगवास पत्करला, यांना काय घाबरायचं? राज्यातील अनेक प्रश्नांवर लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतला टार्गेट केलं जात आहे." ते पुढे म्हणाले की, "मी खासदार असल्याने राज्यसभेच्या कामकाजात सहभाग घेतला आहे. शिवसेनेचा संसदीय लोकशाहीवर विश्वास राहिला आहे. माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई केली जात असेल, तर लोकशाहीला घातक आहे. त्यांना हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार आहे."
ते पुढे म्हणाले की, विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं. त्यांच्यामुळे बदनामी होत आहे. ज्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांच्याविषयी भूमिका व्यक्त केली आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांनी केलेल्या चोरी प्रकरणावरुन (धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव) सुनावणी सुरु आहे. ते आमदार असतील, तर मी खासदार आहे. मी विधीमंडळाचा अपमान करु इच्छित नाही, केलेला नाही.
संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, कोल्हापुरात पोहोचल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. कायदा आणि पोलीस कोणाच्या मर्जीने नाचत आहेत? अशी विचारणा त्यांनी केली. 2024 ला सगळ्यांचा हिशेब देऊ, असा इशारा त्यांनी दिला. जनतेला गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही फिरत असल्याचे ते म्हणाले. संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, "टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ... विधीमंडळ नाही 'चोर'मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदं गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे."
इतर महत्वाच्या बातम्या