(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कौरवामध्येच अभिमन्यू जन्मला, त्यांनी सगळ्यांच्याच दारी जाऊन आरत्या केल्या, खोतांचा शेट्टीवर बोचरा वार
राजू शेट्टी सगळ्यांच्या दाराला जाऊन आरत्या करून आले होते असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींवर (Raju Shetti) जोरदार प्रहार केला.
Sadabhau khot on Raju Shetti : महान शेतकरी नेत्यांचे एकला चलो रे असं काही नव्हतं. ते सगळ्यांच्या दाराला जाऊन आरत्या करून आले होते असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींवर (Raju Shetti) जोरदार प्रहार केला. त्यांनी भाजपलाही आतल्या अंगानं सांगितलं होतं, की मी निवडून आलो तर तुमच्या बरोबरच राहणार. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना सुद्धा सांगितलं होतं आदानींना आपल्याला काढायचं आहे आणि मी तुमच्या बरोबर आहे असं खोत म्हणाले.
अभिमन्यू लढत होता पांडवाच्या बाजूने तुम्ही लढत होता कौरवांच्या बाजूला
राजू शेट्टी खुशीत होते पण महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याबरोबर ते म्हणत आहेत की मी अभिमन्यूसारखं चक्रव्यूवाह अडकलो आहे. अभिमन्यू लढत होता पांडवाच्या बाजूने तुम्ही लढत होता कौरवांच्या बाजूला. आता कौरवामध्ये अभिमन्यू जन्माला आला हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हातकणंगल्यामध्येच मी पाहत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. म्हणून हा कौरवांचा अभिमन्यू आहे म्हणून कळा काढण्यापलीकडे त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही असेही खोत म्हणाले.
शेट्टींचा नंबर तिसरा राहणार
दरम्यान, राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटानेही उमेदवार दिला आहे. पण या निवडणुकीत त्यांचा नंबर तिसरा राहणार असे खोत म्हणाले. उपर आना नाही, उदरही रहना, तुम्हारा काम खतम असे खोत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद