एक्स्प्लोर

Raju Shetti: राजू शेट्टींकडून थेट बदल्यांचे रेट कार्ड जाहीर; 5 लाखांपासून ते 25 कोटींपर्यंत कशी वसुली होते? यादीच केली सादर!

राजू शेट्टी यांनी सरकारकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शासकीय बदल्यांमधील रेटकार्ड जाहीर केले आहे. सात बारा काढण्यापासून ते टक्केवारीपर्यंत किती लाचखोरी होते, याची त्यांनी आकडेवारी सादर केली आहे. 

Raju Shetti: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानंतर आता सर्व बदल्या ॲानलाईन करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीट करुन बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. मात्र, यानंतर सरकारकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शासकीय बदल्यांमधील रेटकार्ड जाहीर केले आहे. सात बारा काढण्यापासून ते टक्केवारीपर्यंत किती लाचखोरी होते, याची त्यांनी आकडेवारी सादर केली आहे. 

5 लाखापासून ते 25 कोटींची वसुली अधिकारी सर्वसामान्य जनतेकडून कशा पद्धतीने करतात हे लोकांनी माझ्याकडे दिले आहे. सदरच्या भ्रष्टाचाराचा विभागनिहाय दरपत्रक आपल्या माहितीस्तव सादर करत आहे. जर सर्वसामान्य जनतेचे होत असलेली आर्थिक पिळवणूक व  सरकारी कार्यालयातील हेलपाटे थांबवून त्यांना गुड गव्हर्नन्स द्यायचे झाल्यास सर्व बदल्या विधी व न्याय विभागाच्या धर्तीवर ऑनलाईन करणे हे त्याचे उत्तर असू शकते, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, गेल्या आठवडाभरात या पत्रानंतर राज्यातील मंत्री खासदार व आमदारांकडून बदलीची सुरी फिरवून घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेकडून ती कशा पध्दतीने वसूल केली जाते याबाबतचा लेखाजोखा अनेक लोकांनी माझ्यासमोर मांडला तो माहितीस्तव पाठवत आहे. व्यवस्थेचा भाग म्हणून व दुबळा घटक म्हणून सर्वसामान्य जनता कशी भरडली जात आहे हे पाहिल्यानंतर मन सुन्न झाले. 

ज्या पध्दतीने एखादा नवस फेडायचे असल्यास वाघाचा किंवा सिंहाचा बळी न देता बोकडाचा बळी दिला जातो कारण तो दुबळा असल्याने प्रतिकार करू शकत नाही. तसाच प्रकार या बदल्यांच्या प्रक्रियेत घडू लागला आहे. राज्यातील मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, खासदार व आमदार यांची घरे भरण्यासाठी बदली नावाची सुरी जेव्हा मानगुटीवर फिरवली जाते तेव्हा त्याची वसुली सर्वसामान्य जनतेच्या खिशातून केली जाते हे त्रिवार सत्य नाकारून चालणार नाही. 

तलाठी

  • सात बारा काढून देणे : 50 रूपये 
  • बोजा नोंद करणे : 2 हजार रूपये 
  • बोजा कमी करणे : 1 हजार रूपये 
  • वारस लावणे : 1 हजार रूपये 
  • दस्त नोंद करणे : 3 हजार ते 5 हजार. 

ग्रामसेवक 

  • नाहरकत दाखला  : 200 
  • बांधकाम परवाना : एक हजार रूपये 
  • विवाह नोंद : 500 रूपये. 
  • औद्योगिक परवाने : 5 हजार रूपये 
  • बांधकाम व रस्ते कामाची बिले काढणे : 2 ते 5 टक्के 

सर्कल

  • नोंदी नियमीत करणे काम 5 हजार 
  • सुनावणी व निकाल : 5 ते 25 हजार 

नायब तहसिलदार व तहसिलदार

  • बांधकाम परवाने , वर्ग 2 ची कामे , कुळ कायदा , रस्ता मागणी करिता सुनावणी लावणे निकाल देणे , 85 ग खाली वारस नोंदणी करणे  नाहारकत दाखले, रॅायल्टी परवाने : 5 हजार ते 25 हजार. 

रजिस्टर ॲाफिस 

  •  दस्त नोंदणी खरेदी विक्री प्रति दस्त 5 हजार. 
  •  गुंठेवारी खरेदी प्रतिगुंठा 10 हजार.  

बांधकाम विभाग 

  • शाखा अभियंता : 2 टक्के 
  • उप कार्यकारी अभियंता : 2 टक्के 
  • कार्यकारी अभियंता : 2 टक्के 
  • बिले काढणे : 2 टक्के 
  • सदरचे टक्केवारी अंदाज पत्रकानुसार आहे कामातील गुणवत्तेवार टक्केवारीत वाढ होते.

पुनर्वसन विभाग

  • पुनर्वसन दाखला देणे 5 ते 15 हजार. 
  • जमीन उपलब्ध करून देणे : सरासरी 1.50 लाख. 
  • कामात जर अनियमितता असेल तर जागा कोणत्या गावात आहे यावरून जागेच्या किमतीनुसार. 

सहकार विभाग

  • संस्था नोंदणी करणे 
  • सहाय्यक निबंधक : 10 हजार ते 50 हजार 
  • जिल्हा उपनिबंधक : 50 हजार. 
  • सोसायटी अथवा पत संस्था नोंदणी : 1 ते 1.50 लाख 
  • लेखापरिक्षण व इतर गोष्टी : 25 हजार. 
  • संस्थेच्या नियमीत कामकाज तपासणी अथवा निवडणूक कार्यक्रम राबविणे : 10 ते 25 हजार.

वन विभाग

  • वन विभागाचे दाखले देण्यासाठी 10 हजार ते 50 हजार. 
  • वन विभागातील विकासकामे अंदाजपत्रकाच्या 10 टक्के 25 टक्के. 
  • अवैद्य तस्करीचे गाड्या वन विभागातून बाहेर सोडणे : 1 ते 3 लाख. 

कृषी विभाग

  • शेतकरी अनुदान रक्कम देणे अनुदानाच्या सरासरी 5 ते 10 टक्के
  • ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंदाजपत्रकाच्या 15 ते 25 टक्के. 

समाजकल्याण विभाग

  • विकासकामात अंदाजपत्रकाच्या 15 ते 25 टक्के. 
  • अनुदान देणे सोईनुसार दर ठरविले जातात सरासरी अनुदान रक्कमेच्या 10 ते 20 टक्के.
  • जातपडताळणी दाखला देणे 30 ते 50 हजार. 

शिक्षण विभाग

  • शिक्षण संस्था मान्यता : 2 ते 5 लाख
  • शिक्षक नेमणुक करणे : 5 ते 7 लाख
  • शिक्षकांना पेन्शन सुरू करणे व ग्रॅच्युटी रक्कम देणे : 1ते 3 लाख 
  • खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकाकडून दरमहा पगाराच्या 5 ते 10 टक्के रक्कम संस्थाचालकाकडून कपात.

महावितरण 

  • शेती पंप व घरगुती वीज कनेक्शन देणे 5 ते 10 हजार. 
  • औद्योगिक कनेक्शन 50 हजार ते 1 लाख. 

जलसंपदा विभाग

  • प्रकल्प अंदाजपत्रकाच्या 15 ते 25 टक्के. 
  • पाणी परवाणा देणे 15 हजार ते 25 हजार 
  • नाहारकत दाखले देणे. 5 हजार. 

नगरविकास 

  • एन. ए. करणे व बांधकाम परवाना सरासरी 15 हजार ते 5 लाख. 
  • झोन दाखले व नाहारकत दाखले : 5 हजार. 
  • नगर पालिका हद्दीतील प्लॅाट वर्ग 1 करणे. प्रति गुंठा 50 हजार ते 1  लाख. 
  • जागांचे आरक्षण बदलणे 5 लाख 25 लाख. 
  • विकासकामासाठी सरासरी 15 ट्क्यापासून ते 40 टक्यापर्यंत टक्केवारी घेतली जाते. 
  • बांधकाम परवाणे व फायर एनओसी. 50 हजार ते 1.50 लाखापर्यंत. 

या व्यतिरिक्त डी. पी. डी. सी., 2515 , अल्पसंख्याक , वैशिष्टपूर्ण , नगरोत्थान , आदिवासी विकास , दलित वस्ती सुधार योजना , तांडा वस्ती सुधार योजना , तिर्थक्षेत्र विकास , पर्यटन , 3054 / 5054 रस्ते सुधारणा, रोजगार हमी योजना  यासारख्या योजनेतील निधी वाटपासाठी 5 टक्यापासून ते 15 टक्यापर्यंत टक्केवारी घेतली जात आहे. 

या व्यतिरिक्त शासनाकडून कॅान्ट्रक्ट बेसिसवर करण्यात येणा-या भरतीत पगारातील 30 टक्के रक्कम कपात करून घेतात. तसेच खाजगी कंपन्यांना दिल्या जाणा-या ठेक्यामध्ये सरासरी 20 टक्के रक्कम मागितली जाते. 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Embed widget