Chandrakant Patil : बहुमत असताना धोका दिल्याने 2019 मध्ये सरकार आलं नाही, आता सुदैवाने आलंय, कामं गाव पातळीवर पोहोचवा; चंद्रकांत पाटलांचा कानमंत्र
Chandrakant Patil : 2019 मध्ये धोका दिल्याने सरकार आलं नव्हतं, पण आता सुदैवाने सरकार आलं असल्याने आपली काम गाव पातळीवर पोहोचवा, असा संदेश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
Chandrakant Patil on MVA Government : 2019 मध्ये बहुमत असताना धोका दिल्याने सरकार आलं नाही, पण आता सुदैवाने सरकार आलं असल्याने आपली काम गाव पातळीवर पोहोचवा, असा संदेश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीवर काँग्रेसवरही हल्ला चढवला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्यामध्ये तर यांची मक्तेदारी असल्यासारखं वागत होते. पहिल्यांदा जिल्हा बँकेत सुरुंग लावला. कोल्हापुरात महानगरपालिका निवडणूक होणार आहे. शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक हे लग्न आहे, त्यामुळे सगळ्यांनी काम करून निवडणूक जिंकायची आहे.
निधीचा विषय संपवून टाका
ते पुढे म्हणाले की, 2019 मध्ये बहुमत असताना धोका दिल्याने सरकार आलं नाही, पण आता सुदैवाने सरकार आले आहे, आपली कामं गाव पातळीवर पोहोचवा. शिंदे गटाचे आणि आपले मतभेद झाले, तर बसून सोडवले पाहिजेत. एकमेकांचे नाते घट्ट झाले पाहिजेत. जिल्हा परिषद, महापालिकेच्या आचारसंहिता लागण्याआधी निधीचा विषय संपवून टाका. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आधी काम मार्गी लागली पाहिजेत.
कोणताही देव किंवा महापुरुष बॅचलर नाहीत
दरम्यान, आपला कुठलाही देव बॅचलर नाही आणि महापुरुषही बॅचलर नाहीत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपला कुठलाही देव बॅचलर नाहीत. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाहीत. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते.
पुढे ते म्हणाले, जगात असा कोणताही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने किंवा परमेश्वराने माणसामध्ये कुठलाच भेद केला नाही. त्यांनी सर्वांना समान बनवले आहे. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे. प्रत्येक माणसाचा जन्म हा शुक्राणूपासून होतो. मात्र तो शुक्राणू आपल्याला दिसत नाही, तरी देखील 100 किलोचा माणूस तयार करतो. त्या शुक्राणूमधून माणूस तयार करणारा कोणीतरी आहे ना? प्रत्येक माणूस हा देवाने वेगळा बनवला आहे, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या