एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav : शिवसेना, राष्ट्रवादी गेले नाहीत तर भाजपने चोरले, त्यांना आता पक्ष नको तर ईडी, सीबीआय पाहिजे; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Maharashtra Election : लोकसभेच्या 23 जागांवर पहिली चर्चा होईल उरलेल्या 25 जागांवर दुसरी चर्चा होईल. तिसरी चर्चा जागांच्या आदलाबदलावर होईल असा माझा अंदाज असल्याचे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी कोल्हापुरात सांगितले.

कोल्हापूर : शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवाले गेले नाहीत, तर भाजपने चोरून नेले आहेत. भाजप बरोबर आता कोणता पक्ष नको तर ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणा पाहिजे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे  गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते आज कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी खेड्यापाड्यात जाऊन भाजप किती फसवं आहे हे जनतेला सांगण्याचे आदेश दिल्याचे भास्कर जाधव यांनी  सांगितले. 

सरकार हटाव आणि देश बचाव असा नारा देऊन मैदानात 

भास्कर जाधव म्हणाले की, भाजपकडून सध्या व्यक्ती प्रथम आणि नंतर देश असं चालू आहे. आधीचा भाजप आणि आताचे भाजप यांच्यात खूप फरक आहे. काँग्रेसने खूप चुका केल्या होत्या हे सांगण्यातच भाजपची पाच वर्षे गेली. नागरिकांनी त्यांना पुन्हा सत्ता दिली, पण जनतेचा भ्रमनिरास झाला. लोकांना खोटी आश्वासनं दिली आणि निर्लज्जपणा दाखवला, त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी खेड्यापाड्यात जाऊन भाजप किती फसवं आहे हे जनतेला सांगा असे आदेश दिले. सरकार हटाव आणि देश बचाव असा नारा देऊन मैदानात उतरलो आहे. 

जागावाटपावर कोणताही वाद न घालता चर्चा करू

जागावाटपावर बोलताना जाधव म्हणाले की, लोकसभेच्या 23 जागांवर पहिली चर्चा होईल उरलेल्या 25 जागांवर दुसरी चर्चा होईल. तिसरी चर्चा जागांच्या आदलाबदलावर होईल असा माझा अंदाज आहे. आम्ही तिन्ही पक्ष कोणताही वाद न घालता चर्चा करू. कोल्हापुरात दोन खासदार गेले म्हणून सेनेची ताकद कमी झाली नाही तर वाढल्याचे जाधव यांनी सांगितले. 

तेच आता उद्धव ठाकरे यांना शिवसेना शिकवत आहेत

ते पुढे म्हणाले की, अजितदादा यांच्या मांडीवर हिंदुत्व ठेवलं म्हणत होते तेच आता अजितदादा यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. भाजपच्या जुन्या लोकांना माहिती आहे की शिवसेनेच्या लोकांमुळे भाजप राज्यात वाढली आहे. बाळासाहेब हयात असताना दीपक केसरकर आणि उदय सामंत शिवसेनेत आले नव्हते. मात्र, तेच आता उद्धव ठाकरे यांना शिवसेना शिकवत आहेत. भास्कर जाधव कोकणातील रस्त्यांवरून बोलताना म्हणाले की, नितीन गडकरी कोकणातील रस्त्यांबाबत सांगतात जागेची समस्या आहे पण ते पूर्ण खोटं आहे. आतापर्यंत चार वेळा कोकणातल्या रस्त्यासाठी भेटलो आहे पण काही झालं नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget