एक्स्प्लोर

Kolhapuri Chappal : अन् कोल्हापुरी चप्पलची न्यायालयातून निर्दोष मुक्तता! नेमकं प्रकरण आहे तरी काय?

kolhapuri Chappal : औरंगाबादमध्ये झालेल्या एका प्रकरणात कोल्हापुरी चपलेवरून वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचला. यामुळे कोल्हापूरी चप्पल न्यायालयात चर्चेचा विषय झाला.

kolhapuri Chappal : कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत कोल्हापुरी चप्पलने (kolhapuri Chappal) एखाद्याचा उद्धार करण्यासाठी (खास करून पायताण म्हणत) दिवसातून कितीतरीवेळा उल्लेख होत असेल, त्याचा अंदाज बांधणे कठिण आहे. त्यामुळे रुबाब मारण्यासाठी आणि रुबाब उतरवण्यासाठी कोल्हापुरी चप्पल पुरेसं आहे असंही म्हणतात. याचा अर्थ कोल्हापुरी चप्पल हे जीवघेणं हत्यार नाही. याच मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खटला रद्द केला आहे. 

अर्थात, कोल्हापुरी चप्पल हे पायात घालण्याचे वाहन आहे. त्यामुळे त्याची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. मात्र, औरंगाबादमध्ये झालेल्या एका प्रकरणात कोल्हापुरी चपलेवरून वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचला. यामुळे कोल्हापूरी चप्पल न्यायालयात चर्चेचा विषय झाला. मात्र, न्यायालयाने कोल्हापुरी चप्पलची निर्दोष मुक्तता केल्याने जगभरातील कोल्हापुरी चप्पलप्रेमींचा आणि समस्त कोल्हापूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती  ठरणार नाही. 

वादाला सुरुवात कशी झाली?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये मंगेश देशमुख आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांनी कोल्हापुरी चपलेने अनंत देशमुख यांना मारहाण केली. कोल्हापुरी चपलेने झालेल्या मारहाणीनंतर अनंत देशमुख यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मारहाण करणाऱ्या मंगेश आणि श्रद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, कोल्हापुरी चपलेने गंभीर दुखापत कशी होईल? असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. यानंतर दोघांची आरोपांतून मुक्तता करण्यात आली. आरोपमुक्त करताना न्यायालयाने कोल्हापुरी चप्पलला 'जीवघेणे हत्यार' नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला. त्यामुळे पायातील वाहन असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलची न्यायालयीन वारी चांगलीच चर्चेत आली. 

जगात भारी कोल्हापुरी चप्पल

कोल्हापूरचा तांबडा पांढरा, कुस्ती, गुळ, कोल्हापुरी साजाप्रमाणेच कोल्हापुरी चप्पलही सातासमुद्रापार पोहोचली आहे. ही चप्पल घातल्यानंतर पायातून कर्र कर्र असा आवाज येत असतो. यासाठी विंचू नावाच्या वनस्पतीच्या बिया वापरल्या जातात. त्यामुळे कोल्हपुरातील सर्वोच्च भेटवस्तू म्हणजेच कोल्हापुरी चप्पल आहे. ज्याची बांधणी कोणत्याही मशीनशिवाय कारागिरांकडून कौशल्याने केली जाते. त्यामुळे ती आकर्षित करणारी असते. तसेच कोल्हापुरी चप्पलचा टिकावूपणा या दोन गोष्टींमुळे या चपला जगप्रसिध्द झाल्या आहेत. 

  • ही चप्पल टिकाऊ, वापरासाठी आरामशीर आणि आकर्षक रंगात मिळतात. 
  • कोल्हापुरी चप्पलची बांधणी 100 टक्के चमड्यापासून केली जाते.
  • त्यामुळे उष्ण वातावरणात घाम आणि उष्णता शोषून पायाला गारवा जाणवतो. 
  • वापरासाठी मऊ आहेत.
  • कोठेही नेणेसाठी या चपला सुंदर, हलक्या व किफायतशीर आहेत.
  • सर्व आकारात उपलब्ध आहेत. (स्त्री व पुरूषांसाठी)
  • या चपला पायाचे सौंदर्य व सुरक्षितता वाढवतात.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget