कोल्हापूरच्या महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात; भरधाव वाहनाची दोन कार आणि चार दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू
कोल्हापुरच्या महावीर चौकात झालेला अपघात एवढा भीषण होता की वाहनांचा चुराडा झाला आहे. धडक दिलेली गाडी जीएसटी विभागाच्या कर्मचाऱ्याची असल्याची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर: कोल्हापूरच्या महावीर कॉलेज चौकात (Kolhapur Mahaveer Chowk Accident) भीषण अपघात झाला आहे. कसबा बावड्याकडून आलेल्या चारचाकीची दोन कार आणि चार दुचाकींना धडक दिली आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघतात चार जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर पोलिस (Kolhapur Police) अधिक तपास करत आहे. ही घटना रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वरुण कोरडे असं मृत तरुणाचं नाव असून तो बॅडमिंटनपटू होता.धडक दिलेल्या गाडीवर भारत सरकार जीएसटी इंटेलिजन्स असं लिहिलं होतं. MH10 EA9495 हा त्या गाडीचा नंबर आहे. ऋषिकेश कोतेकर हा गाडी चालवत होता. गाडी चालवताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे.या चारचाकीने भरधाव येत तीन चारचाकी आणि चार दुचाकींना धडक दिली.
काही काळासाठी वाहतूक विस्कळीत
कोल्हापुरच्या महावीर चौकात झालेला अपघात एवढा भीषण होता की वाहनांचा चुराडा झाला आहे. धडक दिलेली गाडी जीएसटी विभागाच्या कर्मचाऱ्याची असल्याची माहिती समोर येत आहे. अपघात पाहण्यासाठी महावीर कॉलेज परिसरात बघ्यांची गर्दी जमली. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. चारचाकी गाडी वेगात आली होती. मात्र पुढे असलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने मागूनच गाडीने धडक दिली. त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महावीर चौकात झालेला अपघात चिंतेची बाब ठरत आहे. चौकात झालेल्या अपघातामुळे बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. वाहनांची झालेली अवस्था पाहता अपघाताची भीषणता लक्षात येते.
नाशिकमध्ये भीषण अपघात
नाशिक (Nashik) जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी सकाळी ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात (Accident) दोन दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. तर दुसऱ्या व घटनेत मालेगावहून (Malegaon) कळवणच्या दिशेने जाणाऱ्या बुलेटस्वार शिक्षकाचा चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत मृत्यू झाला. गणेश आणि दुर्गेश हे सकाळी दुचाकीने कोनांबेहुन सिन्नरकडे निघाले होते. त्यांची दुचाकी हरसुले गावाजवळील मराठी शाळेसमोर असताना समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दोघे युवक ट्रकच्या पुढील बाजूला धडकून रस्त्यावर फेकले गेले. यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा रस्त्यावरच मृत्यू झाला. डोक्यातुन मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
हे ही वाचा :