एक्स्प्लोर

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला; काय निर्णय होणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष

मुश्रीफ यांना दिलासा मिळणार की कारवाईला सामोरे जावे लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी पार पडल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

Hasan Mushrif : ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर आज (11 एप्रिल) निर्णय होणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळणार की ईडी कारवाईला सामोरे जावे लागणार? याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी पार पडल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे ईडी प्रकरणात मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम होते. 

ईडीने न्यायालयात काय दावा केला? 

ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, "मुश्रीफ यांनी तपासात सहकार्य केलेलं नाही आणि तीन समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच हजर झाले. त्यांची चौकशी कोल्हापुरात नोंदवलेला एफआयआर आणि कंपनी रजिस्ट्रारने दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे." सरसेनापती संताजी शुगर घोरपडे साखर कारखाना लिमिटेडचे शेअर्सच्या रुपात शेतकर्‍यांकडून 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. 2011 मध्ये लोकसहभागातून साखर कारखाना उभारण्यासाठी निधी उभारताना मुश्रीफ यांना भांडवलाची गरज असल्याचा दावा ईडीने केला आहे. 

हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ सुरुच

दुसरीकडे, मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ सुरुच असून आणखी 67 शेतकऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार दाखल केल्याने आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींची संख्या 108 वर पोहोचली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासदत्व देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांच्यावर केला आहे. याप्रकरणी 2 एप्रिल रोजी आणखी 67 शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार केली. मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

कोल्हापुरातील दाखल गुन्ह्यात 24 एप्रिलपर्यंत दिलासा 

दरम्यान, कोल्हापुरातील दाखल गुन्ह्यात मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर या प्रकरणात 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणी येईपर्यंत आता तक्रारदार शेतकऱ्यांची संख्या 108 वर गेली आहे. 

आमदार पी. एन. पाटील स्वतः ईडी कार्यालयात 

दुसरीकडे, आमदार पी. एन. पाटील हे सुद्धा स्वतः ईडी कार्यालयात धडक देऊन आले आहेत. मात्र, त्यांची चौकशी होऊ शकलेली नाही. त्यांना पहिल्यांदा समन्स बजावल्यानंतर ते हजर झाले नव्हते. आता त्यांना नव्याने समन्स बजावण्यात येणार आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) कर्जपुरवठा प्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (KDCC ED Raid) ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या मुश्रीफ यांच्यावर तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. 

तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांनाही समन्स बजावले जाणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget