एक्स्प्लोर

करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी मोठी बातमी! पुढील दोन दिवस देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद, मंदिर समितीचा निर्णय

kolhapur: अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या दोन दिवसांचा विशेष विचार करूनच मंदिर भेटीचे नियोजन करावे, असे मंदिर प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.

Kolhapur: करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर तातडीने संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या (ASI) सर्वेक्षणानुसार ही प्रक्रिया 11 आणि 12 ऑगस्ट रोजी पार पडणार असून, या दोन दिवसांत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. त्याऐवजी उत्सव मूर्तीचे दर्शन भाविकांना खुले असेल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून देवीचे नाक, ओठ, हनुवटी याला तडे गेले असल्याने चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन तातडीने गरजेचे आहे असा अहवाल न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने दिला होता 

पुरातत्व विभागाची शिफारस

भारतीय पुरातत्व विभागाने अलीकडेच अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात मूर्तीचे दीर्घकाळ जतन व्हावे आणि मूर्तीवर होणारा हवामान, प्रदूषण आणि इतर घटकांचा परिणाम कमी व्हावा, यासाठी तातडीने संवर्धन प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, 11 आणि 12 ऑगस्ट या दोन दिवसांत मूर्तीवर विशेष संवर्धन तज्ञांकडून रासायनिक व संरक्षक प्रक्रिया केली जाणार आहे.

दर्शनाची व्यवस्था

या संवर्धन प्रक्रियेच्या काळात मूळ मूर्तीचा गाभारा भाविकांसाठी बंद राहील. मात्र, भाविकांची श्रद्धा व सोय लक्षात घेऊन या काळात अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. या उत्सव मूर्तीचे दर्शन भाविकांना नेहमीप्रमाणे घेता येईल. मंदिर प्रशासनाने याबाबत स्वतंत्र रांग व दर्शन व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे, ज्यामुळे भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी गाभाऱ्यातील मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार असल्याची नोंद घ्यावी. या दिवसांत मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने भाविकांनी शिस्त व संयम बाळगावा, तसेच मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

मंदिराचा ऐतिहासिक वारसा

अंबाबाई मंदिर हे कोल्हापूरचे आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभव असून, करवीर नगरीचे मुख्य आकर्षण आहे. देवीची मूळ मूर्ती शतकानुशतके भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. मूर्तीच्या संवर्धनासाठी केवळ तज्ञांना प्रवेश दिला जाणार असून, या प्रक्रियेत पारंपरिक पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मूर्तीवर एक संरक्षक थर तयार होईल, ज्यामुळे तिची दीर्घायुष्य वाढेल आणि भविष्यातील हानी टाळता येईल. यामुळे, अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या दोन दिवसांचा विशेष विचार करूनच मंदिर भेटीचे नियोजन करावे, असे मंदिर प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget