![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: कोल्हापुरात शहिदांच्या 73 कुटुंबीयांचा सत्कार; हुतात्मा स्मारकात 326 वीरांची नावे शिलाफलकावर
Kolhapur News: हुतात्मा स्मारकातील शिलाफलकावर शहरातील हयात आणि दिवंगत स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या वीरांची नावे कोरली गेली आहेत.
![Kolhapur News: कोल्हापुरात शहिदांच्या 73 कुटुंबीयांचा सत्कार; हुतात्मा स्मारकात 326 वीरांची नावे शिलाफलकावर Kolhapur News 73 families of martyrs felicitated in Kolhapur mnc Names of 326 heroes on plaques in Martyrs Memorial Kolhapur News: कोल्हापुरात शहिदांच्या 73 कुटुंबीयांचा सत्कार; हुतात्मा स्मारकात 326 वीरांची नावे शिलाफलकावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/14/74c11357fbb99d48756e3b96fcefe5cb1691988188973736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील प्रतिभानगरमधील हुतात्मा स्मारकमध्ये 326 वीरांची नावे असलेल्या शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वीरांना महापालिकेच्यावतीने वंदन करुन शपथ घेण्यात आली. हुतात्मा स्मारकातील शिलाफलकावर शहरातील हयात आणि दिवंगत स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या वीरांची नावे कोरली गेली आहेत.
वसुधा वंदन अंतर्गत प्रतिभानगरमधील वि. स. खांडेकर शाळेमध्ये अमृत वाटीका तयार करण्यात आली आहे. या वाटीकेमध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार, स्वातंत्र्य सैनिक, जवानांचे कुटुंबीय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वाटिकेतील मातीला वंदन करुन मातीचा अमृत कलश तयार करण्यात येणार आला आहे.
शहिदांच्या 73 कुटुंबीयांचा सत्कार
दरम्यान, कोल्हापूर मनपाकडून हयात स्वातंत्र्यसैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलिस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या 73 वारस कुटुंबियांचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहीद झालेल्या 73 वारस कुटुंबियांना कोल्हापूरी फेटा, शाल, श्रीफळ, रोपवाटीका देऊन सत्कार करण्यात आला. कुटुंबीयांना घेऊन येण्यासाठी चार विभागीय कार्यालयाकडून केएमटी बसची स्वतंत्र व्यवथा करण्यात आली होती. प्रतिभानगरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात टेंबलाईवाडी विद्या मंदिरच्या विद्यार्थीनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत आडसूळ, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, प्रशासन अधिकारी एस.के.यादव, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, सतीश फप्पे, रमेश कांबळे, नगरसचिव सुनिल बिद्रे, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबरे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपुत, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, राजसिंह शेळके, स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन विभागातील हयात व शहीद झालेल्या वीरांचे कुटुंबीय व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाकडे पाठ
दुसरीकडे, या कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधी फिरवलेली पाठ ठळकपणे दिसून आली. दोन खासदार आणि तीन आमदारांना निमंत्रणे देण्यात आली होती. मात्र, कोणीच कार्यक्रमाला न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)