Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 11
Kolhapur municipal corporation elections 2022 : प्रभाग क्रमांक 11 मध्ये कोल्हापूर शहराचा मध्यवर्ती परिसर येतो. त्यामुळे हा भाग दाट लोकवस्तीचा आणि व्यापारपेठ परिसर आहे.
Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारुप रचना तसेच आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. प्रभागनिहाय मतदार याद्याही 23 जूनला प्रसिद्ध होणार आहेत. प्रभाग क्रमांक 11 मध्ये शहराचा मध्यवर्ती परिसर तसेच अंबाबाई मंदिर परिसरही येतो. त्यामुळे हा भाग दाट लोकवस्तीचा आणि व्यापारपेठ परिसर आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, करवीव पोलिस स्टेशन,
प्रभाग क्रमांक 11 मध्ये किती भाग येतो ?
सीपीआर, टाऊन हाॅल, अकबर मोहल्ला, महाराणा प्रताप चौक, भवानी मंडप, गुजरी, अंबाबाई मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, शिंगोशी मार्केट, खासबाग मैदान, बिंदू चौक, शाहू क्लाॅथ मार्केट, अयोध्या टाॅकीज, दसरा चौक, मुस्लीम बोर्डिंग
प्रभाग 11 मध्ये आरक्षण या पद्धतीने असेल
नव्या प्रभागरचनेनुसार कोल्हापूर महापालिकेसाठी 31 प्रभाग आहेत. त्रिसदस्यीय प्रभाग रचना असल्याने एका प्रभागात 3 नगरसेवक असतील. प्रभाग क्रमांक 11 मध्ये 11 अ सर्वसाधारण महिला 11 ब सर्वसाधारण महिला आणि 11 क सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे.
विद्यमान नगरसेवक 2015 ते 2020
विद्यमान नगरसेवकांचा कालावधी 2020 मध्येच समाप्त झाला आहे. त्यामुळे आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2015 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते. आगामी निवडणुकीसाठी ईश्वर परमार, अदिल फरास, आर.डी. पाटील, रियाज सुभेदार, इंद्रजित सलगर, अजित पोवार, मेहजबीन सुभेदार, पृथ्वीराज जगताप आदी उमेदवार इच्छूक आहेत.
वाॅर्ड रचना कशी आहे ?
प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकूण 18 हजार 614 लोकसंख्या येते. यामध्ये अनुसूचित जाती 430, तर अनुसूचित जमातींची संख्या 51 आहे.
पुर्वेकडून टायटन शोरुम सुभाष रोडने दक्षिणेस सुर्या हॉस्पिटलपर्यंत तेथून पश्चिमेस पॅसेजने सीपीआर अग्नेय कोपरा रिक्षा स्टॉप ते दक्षिणेस स्वयंभू गणेश मंदीर ते शाहू टॉकिज ते पदमा टॉकीजचे दक्षिण बाजू रस्त्याने पुर्वेस धान्य लाईन चौक दक्षिणेकडे पानलाईन पॅसेजने पुन्हा पश्चिमेकडे लक्ष्मीपूरी जैन श्वेतांबर मंदिराचे दक्षिणेकडील गल्लीने सत्य नारायण तालीम तेथून दक्षिणेकडील पॅसेजने शिवाजी रोड बिंदू चौक ते मलादिया खाँ पुतळा दक्षिणेकडे देवलक्लव केशवराव भोसले नाटयगृहाचे पूर्वेकडील रस्त्याने अग्नेय कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे खासबाग मैदान दक्षिणबाजू रस्त्याने मिरजकर तिकटी चौक तेथून दक्षिणेकडे मारूती मंदिरापासून पूर्वेकडे तस्ते गल्लीने शिगोशी मार्केट पुर्वेकडील रस्त्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्थाने कोष्टी गल्ली पश्चिमेकडे चौंडेश्वरी हॉलपासून दक्षिणेकडे मंडलिक गल्लीपर्यंत.
पश्चिम दिशेने पद्माराजे हायस्कुल समोरील चौक उत्तरेस खरी कॉर्नर ते बिनखांबी मंदीर ते महाव्दार रोडने पापाची मिकटी. तेथून माळकर तिकटी चौक ते भाऊसिंगजी रोडने उत्तरेस सरदार पैसेजपर्यंत पश्चिमेस सरदार पॅसेज ते | सोन्यामारुती रस्ता तेथून पूर्वेस शिवगंगा अपार्टमेंट चे उत्तरेकडून टाऊन हॉल कंपॉड तेथून उत्तरेस टाऊन हॉल बागेमधून सोन्या मारुती बसस्टॉप तेथून धर्मादाय आयुक्त क्वार्टरचे पश्चिमेकडून शाहू समाधीस्थळ पुर्व बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलचे पूर्व बाजू हद्दीने सिध्दार्थ नगर मेनरोड पर्यंत
दक्षिणेकडून मंडलीक गल्ली ते तुरबत ते कळंबा रोड साई मंदीर चौक ते उत्तरेस कोळेकर तिकटी ते पश्चिमेस सनगर गल्लीने पदमाराजे हायस्कूल समोरील चौकापर्यंत
उत्तरेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल पूर्वबाजू शिर्के उद्यान उत्तर बाजू रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान ते टाऊन हॉल चौक (चिमासाहेब चौक) ते दसराचौक ते टायटन शोरुम सुभाष रोड
राजकीय बलाबल
कोल्हापूर उत्तर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलून गेली आहेत. धनंजय महाडिक राज्यसभा खासदार झाल्याने ताराराणी आघाडी आणि भाजपला चांगलेच बळ आले आहे. कोल्हापूर उत्तर निवडणुकीत भाजपला 78 हजारांवर मते मिळाल्याने या प्रभागात चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच प्रभागामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी तसेच शिवसेनेविरोधात भाजप उमेदवार असेल. त्यामुळे बंटी विरुद्ध मुन्ना असा सामना या ठिकाणी नक्की दिसेल.