एक्स्प्लोर

Kolhapur Loksabha : कोल्हापुरात पहिल्या दोन तासात कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीर मतदारसंघात मतदानात चुरस!

Kolhapur Loksabha : सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. 

कोल्हापूर : अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे देश लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज (7 मे) मतदान होत आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. कोल्हापूरमध्ये करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक असा थेट सामना होत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड, कागल आणि राधानगरी-भुदरगड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. 

सकाळी नऊपर्यंत कुठं किती मतदान? 

चंदगडमध्ये नऊ वाजेपर्यंत 5.60 टक्के मतदानाची नोंद झाली. कागलमध्ये 8.98 टक्के मतदानाची नोंद झाली. करवीरमध्ये 11.71 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 9.68 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिणमध्ये 9.6 टक्के मतदानाची नोंद झाली. राधानगरीमध्ये सकाळच्या पहिल्या दोन तासात कमी प्रतिसाद लाभला असून 3.50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण उत्तर आणि करवीर मतदारसंघांमध्ये मतदारांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्ये आजपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी सरासरी 70 टक्क्यांच्या घरामध्ये मतदान झालं आहे. त्यामुळे त्याच टक्क्यांमध्ये मतदान होण्यासाठी महायुती महाविकास आघाडीकडून झंझावती प्रचार झालाच आहे. त्याचबरोबर मतदारांना मतदानापर्यंत नेण्यासाठी सुद्धा प्रयत्नांची शर्थ केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा दणका चांगलाच वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम मतदानावर होत आहे. यासाठी 12 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. 12 वाजेपर्यंत मतदानानंतर पुन्हा तीन वाजल्यानंतर मतदानासाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोल्हापूरमध्ये 23 उमेदवार रिंगणात

कोल्हापूरमध्ये 23 उमेदवार रिंगणात असले, तरी थेट लढत संजय मंडलिक आणि शाहू छत्रपती महाराज यांच्यामध्येच आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंलगेच्या जागेवर कमालीचं लक्ष केंद्रित केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Embed widget