![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur : कोल्हापूर पर्यटकांनी हाऊसफुल्ल! करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी
Ambabai Mandir Kolhapur : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शाळांना असलेल्या सलगच्या सुट्ट्या तसेच नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीमध्ये कोल्हापूर शहर अक्षरशः पर्यटकांनी गजबजून गेले.
![Kolhapur : कोल्हापूर पर्यटकांनी हाऊसफुल्ल! करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी Kolhapur is full of tourists Huge crowd in Ambabai temple Kolhapur : कोल्हापूर पर्यटकांनी हाऊसफुल्ल! करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/acc8f26cc962dabb56b12e60bd5cdc37167264013766388_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ambabai Mandir Kolhapur : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शाळांना असलेल्या सलगच्या सुट्ट्या तसेच नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीमध्ये कोल्हापूर शहर अक्षरशः पर्यटकांनी गजबजून गेले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पर्यटकांनी गर्दी केल्याने अर्थातच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (Ambabai Mandir Kolhapur) दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या 6 लाख 79 हजार 629 वर गेली. याबाबत पश्चिम महाराष्ट्र दिवस समितीने माहिती दिली आहे.
दरम्यान नववर्षाच्या स्वागताला सुद्धा भाविकांनी मंदिरात (Ambabai Mandir Kolhapur) मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे एक जानेवारी रोजी फक्त एका दिवसातच 1 लाख 71 हजार 823 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेत नववर्षाचा संकल्प केला.पर्यटकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण आल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून आठवडाभरापासून कोल्हापूरमध्ये भाविकांचा गर्दीचा अक्षरशः महापूर सुरू आहे.
अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी काल दिवसभर भाविकांची गर्दी वाढल्याने लांबच लांब रांगा दिसून आल्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी मंदिरात दिसून आली. सरलष्कर भवनसमोरील प्रवेशद्वारापासून भवानी मंडपातील नगारखान्यापर्यंत भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती.
दुसरीकडे कोल्हापूर शहरांमध्ये काल हिंदू जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांवरही मोठा ताण होता. मोर्चामुळे वाहतूक व्यवस्थेची कोंडी होणार नाही, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाहेरून आलेल्या पर्यटकांना वाहनांचे पार्किंग छत्रपती शाहू स्टेडियम, छत्रपती शिवाजी स्टेडियम, लक्ष्मीपुरी, बाबूजमाल परिसरात जागा मिळेल्या त्या ठिकाणी वाहने पार्किंग करण्याची वेळ आली. दुपारच्या सत्रात आलेल्या पर्यटकांनी बिंदू चौकात वाहनांचे पार्किंगची सोय करण्यात आली. काही भाविकांना पार्किंगसाठी जागा न मिळाल्याने दूरवर वाहने पार्किंग करून दर्शनासाठी पायपीठ करत यावे लागले.
शालेय सहली सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल
शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे असल्याने कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात शालेय सहली दाखल होत आहेत. कोल्हापूर शहरातील रंकाळा, जोतिबा, अंबाबाई मंदिर, खिद्रापूर मंदिर, पन्हाळा, राधानगरी आदी ठिकाणी जाण्यासाठी सहली दाखल झाल्या होत्या. दुसरीकडे, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूर अभयारण्य मात्र बंद ठेवण्यात आले होते. वन्यजीवांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आजपासून दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी पूर्ववत होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)