एक्स्प्लोर

Kolhapur, Hatkanangle loK Sabha Election : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी मतमोजणी तयारी पूर्ण; किती फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार?

कोल्हापुरात शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे. हातकणंगलेत राजू शेट्टी, सत्यजित पाटील आणि धैर्यशील मानेंमध्ये तिरंगी लढत होत आहे. सर्वच उमेदवारांकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Loksabha) आणि हातकणंगले लोकसभा (Hatkanangle loK Sabha) निवडणुकीची  मतमोजणी 4 जून रोजी होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार असून जिल्हा प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. इतर सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर लोकसभेची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावड्यात होणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय गोदाम इमारत, राजाराम तलाव, कोल्हापूर याठिकाणी होणार आहे. तयारीचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन्ही ठिकाणी सोमवारी भेट देत घेतला. कोल्हापुरात शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे. हातकणंगलेत राजू शेट्टी, सत्यजित पाटील आणि धैर्यशील मानेंमध्ये तिरंगी लढत होत आहे. सर्वच उमेदवारांकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अंतिम चित्र 4 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. 

यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था, सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणी येण्या-जाण्याचे मार्ग आदी विषयांबाबत पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हाकणंगले लोकसभा संजय शिंदे, उप जिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी  उपस्थित होते.

मतमोजणीसाठी 686 कर्मचारी नियुक्त, बाराशेहून अधिक पोलिसांची सुरक्षा 

पोस्टलची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. ईव्हीएमवरील मतमोजणी सकाळी साडे आठ वाजता सुरू होईल.  कोल्हापूर लोकसभेला मतमोजणीसाठी 349, हातकणंगले मतमोजणीसाठी 337 कर्मचारी असे मिळून एकुण 986 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अतिरिक्त 10 टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव असणार आहेत. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 600-600 पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात येणार आहेत. 

टेबल संख्या आणि मतमोजणी फेऱ्या किती होणार?

  • कोल्हापूरच्या सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या आहे.
  • चंदगड 28, राधानगरी 31, कागल 26, कोल्हापूर दक्षिण 24, करवीर 26 आणि कोल्हापूर उत्तरची 23 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. 
  • हातकणंगलेसाठी सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या आहे.
  • शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी 24, इचलकरंजी 19, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी 21 तर शिरोळसाठी 24 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे.
  • प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे़ . 

टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केला आहे. ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा, ऑडिओ व्हीडीओ रेकॉर्डर- पेन, आदी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे.

मतमोजणी टेबलची रचना

1. एक मतमोजणी पर्यवेक्षक 
2. एक मतमोजणी सहाय्यक 
3.एक शिपाई 
4. एक सूक्ष्म निरीक्षक 

मतमोजणीच्या ठिकाणी अशा असणार सुविधा 

मतमोजणीसाठी कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक / मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था, पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा असणार आहे. संपुर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशाराSpecial Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?Zero Hour | 'वक्फ' धर्माचा नाही तर संपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा, मग विधेयकाला विरोध का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget