Kolhapur Ganesh Immersion : कोल्हापुरात गणेश मिरवणूक पाहण्यासाठी येताय? जाणून घ्या कोणता मार्ग सुरु अन् बंद, पार्किंगची व्यवस्था कोठे असेल
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
Kolhapur Ganesh Immersion : तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून मिरवणूक मार्गावर कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
निश्चित करण्यात आलेल्या तिन्ही मार्गांवर चोख व्यवस्था प्रशासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रमुख विसर्जन मार्ग खालीलप्रमाणे असेल
पार्वती सिग्नल-उमा टॉकीज - सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौक-टेंबे रोड देवल क्लब-मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदीर - महाद्वार रोड- पापाची तिकटी - गंगावेश-पाडळकर मार्केट-रंकाळा स्टॅन्ड-रंकाळा टॉवर-जॉकी बिल्डींग-संध्यामठ- तांबट कमान-राज कपूर पुतळा-देवकर पाणंद पेट्रोल पंप- इराणी खण
पारंपरिक पर्यायी मार्ग क्रमांक 2
उमा टॉकीज चौक- आझाद चौक-दुर्गा चौक-बिंदु चौक-शिवाजी रोड-शिवाजी महाराज पुतळा चौक-पापाची तिकटी -गंगावेश-पाडळकर मार्केट-रंकाळा स्टॅन्ड-रंकाळा टॉवर-जॉकी बिल्डींग-संध्यामठ- तांबट कमान-राज कपूर पुतळा-देवकर पाणंद पेट्रोल पंप- इराणी खण
नवीन समांतर पर्यायी विसर्जन मार्ग क्रमांक 3
उमा सिग्नल चौक-सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौक-गोखले कॉलेज चौक- यल्लमा ओढा- हॉकी स्टेडीयम-निर्माण चौक -इंदिरा सागर-संभाजीनगर-देवकर पाणंद चौक-क्रशर चौक -इराणी खण
या मार्गावर वरील दोन्ही मिरवणुक मार्गावर असणाऱ्या सर्वप्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देणेत येणार आहेत. या तिन्ही मार्गाला जोडणारे सर्व जोडरस्ते मोटार सायकलसह सर्व मोटार वाहनांना गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाहतूकीस बंद करणेत येत आहे. या जोड मार्गाने मिरवणुकीच्या मार्गावर कोणतेही वाहन येणार नाही.
आपत्कालिन वाहनांसाठी अशी असेल सोय
जोतिबा रोड-भवानी मंडप हा रस्ता महाद्वार रोड मिरवणूक मार्गावरून आपत्कालिन सेवेसाठी भाऊसिंगजी रोडवर येण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सदर मार्गावर वाहने पार्क होणार नाहीत तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना मनाई असेल.
वाहतुकीसाठी बंद व खुले करण्यात येणारे मार्ग
- रत्नागिरी मार्गे कोल्हापूर शहरात येणारी वाहतूक शिवाजी पूल ते सीपीआर चौक येथे येईल. कोल्हापूर शहरातून पन्हाळा दिशेकडे जाणारी वाहतूक सीपीआर चौक- तोरस्कर चौक ते शिवाजी पूल मार्गे मार्गस्थ होतील. सीपीआर चौकातून कोणतेही वाहन छ. शिवाजी पुतळा चौकाकडे जाणार नाही.
- कोल्हापूर शहरातून गारगोटी, राधानगरी, गगनबावड्याकडे जाणारी व येणारी सर्व वाहतूक ( मालवाहतूक ट्रक, बस, एसटी ट्रॅक्टर ट्रॉली) ताराराणी पुतळा- रेल्वे उडाणपूल हायवे कॅन्टीन चौक-सायबर कॉलेज चौक- रिंग रोड मार्गे हॉकी स्टेडीयम येथून डावीकडे वळण घेत रामानंद नगर ते कळंबा जेल साई मंदीर रिंग रोड, नवीन वाशी नाका व फुलेवाडी रिंगरोडने पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. त्यांना शहरामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
- फुलेवाडी मार्गे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना फुलेवाडी नाका या ठिकाणी प्रवेश बंद असेल सदर वाहनांनी फुलेवाडी रिंगरोड ते नवीन वाशी नाका ते कळंबा ते कळंबा जेलच्या पुढे उजवीकडे वळण घेवून रामानंदनगर, जरगर नगर, आरके नगर, मोरेवाडी नाका, सुभाषनगर, एसएससी बोर्ड, एनसीसी भवन, सायबर चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
- शिये फाटा येथून कसबा बावडा मार्गे शहरात येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहने उत्सव काळात या मार्गाने न येता सर्व प्रकारची जड, अवजड मोटार वाहने राष्ट्रीय महामार्गावरून पुढे जाऊन ती तावडे हॉटेल ते शिरोली टोल नाका मार्गे शहरात येवून सोयीनुसार पुढे मार्गस्थ होतील. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरातून कसबा बावडा मार्गे शिये फाटा व राष्ट्रीय महामार्गावर जाणारी वाहने सुध्दा ताराराणी पुतळा ते शिरोली टोल नाका ते तावडे हॉटेल मार्गे शहराबाहेर जातील.
वरील सर्व मार्ग उद्या 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यत प्रवेश तसेच खुले असतील.
नो पार्किंग
गणेश विसर्जन मुख्य मार्गास जोडणारे उप मार्गावर मुख्य मिरवणूक मार्गापासून 100 मीटर परिसरापर्यंत सर्व प्रकारच्या मोटार वाहनाना नो पार्किंग करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील मोटार वाहनांना वगळून)
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांना पार्किंग सुविधा खालीलप्रमाणे असेल
- दसरा चौक - दुचाकी/चारचाकी
- तोरस्कर चौक शाळा-दुचाकी
- शिवाजी स्टेडियम - दुचाकी
- 100 फुटी रोड - चार चाकी
- शाहू दयानंद हायस्कूल -चार चाकी
- पेटाळा मैदान- चार चाकी
- निर्माण चौक - चार चाकी
- सिद्धार्थनगर कमान - दुचाकी
- दुधाळी - दुचाकी/चार चाकी
- ताराराणी हायस्कूल, मंगळवार पेठ - दुचाकी
- गांधी मैदान - चार चाकी
- संभाजीनगर बसस्थानक - चारचाकी
इतर महत्वाच्या बातम्या