एक्स्प्लोर

Kolhapur Flood Update : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद? सर्व मार्ग एका क्लिकवर

Kolhapur Flood Update : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग व 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 48 मार्ग बंद झाले आहेत. 

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग व 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 48 मार्ग बंद झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर असल्याने 95 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

करवीर तालुक्यातील कोणते मार्ग

शाहू नाका कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 वडणगे निगवे दुमाला, शिये टोप राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला मिळणारा ते एमआयडीसी पूल कसबा बावडा रस्ता रामा 194 वर शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी आंबेवाडी, चिखली मार्गे वाहतुक सुरु. तसेच शिये कसबा बावडा रस्त्यावर महानगरपालिका हद्दीत पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग शिये फाटा राष्ट्रीय महामार्ग शिरोली नाका, कोल्हापूर मार्गे सुरु.

कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी मार्गावर चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद.  पर्यायी मार्ग हलकर्णी फाटा दाटे मार्गे चंदगड मार्गे वाहतुक सुरु. 

गडहिंग्लज - कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी रस्ता बंद. पर्यायी गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ, गजरगाव, महागावमार्गे वाहतूक सुरु.

राधानगरी- देवगड-राधानगरी-मुरगुड-निपाणीवर मुरगूडजवळ 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद. पर्यायी रस्ता मुरगुड चिमगाव मार्गे गारगोटी व कोल्हापूर तसेच निढोरी कागल.

चंदगड- चंदगड-हिंडगाव-इब्राहिमपूर चितळे- आजरा रस्त्यावर इब्राहिमपूर पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी कुरणी गवसे इब्राहिमपूर अडकूरमार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर कासारी नदीचे 4 फूट पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद. पर्यायी पोहाळे, पोहळवाडी मार्गे बाजारभोगाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

पन्हाळा- आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर कासारी नदीचे 5 फूट पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद. पर्यायी मलकापूर मार्गे कोल्हापूर वाहतुक सुरु आहे.

करवीर- आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर प्रयाग पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी बालिंगे, खुपिरे, येवलूज, निटवडे, वरणगे, पाडळी मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- निढोरी, गोरंबे, कागल , सांगाव, यळगुड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाडला मिळणारा मार्ग पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग हेरवाड पाचवा मैल मार्गे वाहतुक सुरु आहे. 

हातकणंगले- निढोरी, गोरंबे, कागल , सांगाव, यळगुड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाडला जोडणाऱ्या मार्गावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, रुई मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- जाजल पेट्रोल पासून कणेरी, गिरगाव ते राज्यमागर्ग क्र. 196 नंदवाळ, रामा 189 वाशी, महे, कोगे, कुडीत्रे फॅक्टरी रामा 177 वाकरे फाटा, खुपीरे, यवलुज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे वडगांव, हेर्ले प्ररामा 6 (रा.म.मा.166)  रुकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पंपाजवळ मिळणारा रस्ता रा.मा. 194 अ वर कुडीत्रे, कोगे पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी कोगे फाटा, बालिंगे, कुडीत्रे मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- पन्हाळा, वाघबीळ, बोरपाडळे, वाठार तर्फे वडगाव, हातकणंगले, इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी राज्य हद्दीपर्यंतचा राज्य मार्ग क्र. 192 वर पंचगंगा नदीवरील लहान पुलावरुन पाणी वाहत असल्याने लहान पुलावरुन वाहतुक बंद करण्यात आली आहे. पर्यायी इचलकरंजी, कबनुर, रुई, पट्टणकोडोली, हुपरी मार्गे  वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- पन्हाळा, वाघबीळ, बोरपाडळे, वाठार तर्फे वडगाव, हातकणंगले, इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी राज्य हद्दीपर्यंतचा राज्य मार्ग क्र. 192 वर यशदा पूल बाह्य वळण रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी इचलकरंजी, कबनुर, रुई, पट्टणकोडोली, हुपरी मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- अतिग्रे, कबनूर, इचलकरंजी, टाकवडे, शिरढोण, मजरेवाडी, अकिवाट, टाकळी, खिद्रापूर ते जिल्हा हद्द रा.मा. 200 वर शिरढोण पुलावर 4 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून पर्यायी इचलकरंजी ,यड्राव, नांदणी, शिरोळ, कुरुंदवाड मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड- शिरगांव, नागनवाडी, मजरे, तडशिनहाळ, बेळगांव राज्य हद्दीपर्यंत राज्य मार्ग क्र. 180 वर (दाटे गावाजवळ) अंदाजित 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी रामा 180 ते तांबूळवाडी, बगीलगे, माणगांव इजिमा 191 ते सोनारवाडी, आमनोळी ते रामा 189 मार्गे वाहतुक सुरु आहे.

प्रमुख जिल्हा मार्ग

शिरोळ-  चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर शिरोळ केटीवेयर वर 6 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ रामा 153 मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.
 
शिरोळ-  चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर अनवटी ओढ्यावर 5 फूट पाणी आल्याने  रस्ता बंद पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ रा.मा. 153 मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर  बस्तवाड ओढ्यावर 1 फूट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी करुंदवाड मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- जयसिंगपूर, नांदणी, शिरढोण ते अब्दुललाट रस्ता प्रजिमा 105 वर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी नांदणी, हरोली, जांभळी, टाकवडे मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- गुरुदत्त साखर कारखाना ते टाकटीवाडी, घोसरवाड, काळम्मावाडी वसाहत, घोसरवाड नदी पानवठा ते कर्नाटक राज्य हद्दीपर्यंत रस्ता प्रजिमा 92 वर 5 फुट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी मार्ग नाही.

 शिरोळ- कबनुर, गंगानगर, सा.का. शहापूर, यड्राव सुतगिरणी, जांभळी, हरोली, नांदणी, धरणगुत्ती ते शिरोळ रा.मा. क्र.153 ला मिळणारा प्रजिमा क्र. 31 वर 3 फुट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी नांदणी, जयसिंगपूर, शिरोळ मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- कबनुर, गंगानगर, सा.का. शहापूर, यड्राव सुतगिरणी, जांभळी, हरोली, नांदणी, धरणगुत्ती ते शिरोळ रा.मा. क्र.153 ला मिळणारा प्रजिमा क्र. 31 वर 5 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी नांदणी, जयसिंगपूर, शिरोळ मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- कुरुंदवाड, नांदणी ते प्ररामा 6 ला मिळणारा रस्ता प्र.जि.मा 73 वर 2.5 फूट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, नांदणी मार्गे वाहतुक सुरुद आहे.

हातकणंगले- वडगांव, लाटवडे, भेंडवडे, खोची ते दुधगांव, आष्टा जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा क्र. 109 वर रस्त्यावर पाणी आल्यानु रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी भेंडवडे, लाटवडे, भादोले, आष्टा मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- निलेवाडी, जुने पारगांव, नवे पारगांव, पाडळी, अंबप, वडगांव, तासगांव, मौजे वडगांव ते रामा क्र. 194 रस्ता प्रजिमा 96 वरील वारणा नदी पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी अमृत नगर, चिकुर्डे मार्गे वाहतुक सुरु आहे.

आजरा-  नवले, देवकाडगांव, कोरीवडे, पेरनोली, साळगाव रामा क्र. 188 ला मिळणारा प्रजिमा क्र. 58 वर साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी सोहळे, बाची मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- शिरोली दुमाला, बाचणी, सडोली, खा. हळदी, कुर्डू, इस्पुर्ली, नांगाव, नंदगांव, एकोंडी, व्हन्नूर ते रामा क्र. 195 ला पिंपळगांव नजिक मिळणारा प्रजिमा क्र. 37 वर बाचणी बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद पर्यायी बाचणी, सडोली खालसा, हळदी मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- यवलुज, दोनवडे ते रामा 177 पुढे बालिंगे, महेपाटी, बीड, शिरोली, सडोली दुमाला, चाफोडी, गरजण, कोते, चांदे, धामोड, शिरगाव, तारळे खु, पडळी, कारिवडे, ओलवन, तारळे खुर्द, कसबा तारळे, पिरळ, पडळी मार्गावरील क// बीड व महे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी बालिंगे, कुंभी, कारखाना, सांगरुळ, महारुळ, बीडशेड मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- चांदे, घुंगुरवाडी, हसुर, येवती पाटी, वडकशिवाले, बाचणी साके प्रजिमा 42 वर पाणी आल्याने बाचणी धरणावर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी, साके मार्गे वाहतुक सुरु आहे.

गडहिंग्लज- निलजी, नूल, प्रजिमा 56 ते प्रजिमा 57 पासून येणेचवंडी, नंदनवाड, रा.मा. 201 ला मिळणारा प्रजिमा 86 वर बंधाऱ्यावर 1 फूट पुराचे पाणी आल्याने बॅरीकेटींग लावून वाहतुक बंद असून पर्यायी जराळी, दुंडगे प्रजिमा 80 मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- बिद्री, सोनाळी, सावर्डे बु., सावर्डे खु., केनवडे, गोरंबे, आनुर, बस्तवडे ते रामा क्र. 178 ते हमीदवाडा, नंद्याळ ते प्र. 54 ला मिळणारा प्रजिमा क्र . 46 वर वेदगंगा नदीचे साखळी क्र. 18/600 3 फूट आल्याने पाणी रस्त्यावर रस्ता बंद पर्यायी राज्य मार्ग 178 राधानगरी, मुरगुड, निपाणी रस्त्यावरुन चालू व राज्य मार्ग 195 निढोरी, गोरंबे, कागल मार्गे वाहतुक सुरु आहे.

 कागल- सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली, खा. कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वरील कर्नाटक हद्दीतील वेदगंगा नदीचे पाणी पुलावर 4 फूट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी मार्ग इस्पुर्ली नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी साके मार्गे सुरु करण्यात आली आहे.

कागल- सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली खा. कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वर कर्नाटक हद्दीतील वेदगंगा नदीचे 2 फुट पाणी पुलावर आल्याने रस्ता बंद असून पर्यायी इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी, साके मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली खा. कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वर वर कर्नाटक हद्दीतील वेदगंगा नदीचे 5 फुट पाणी पुलावर आल्याने रस्ता बंद असून पर्यायी इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी, साके मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली खा.,  कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वर सरपिराजी तलावाचे सांडव्याचे पाणी 2 फूट इतके रस्त्यावर आल्यने वाहतुक बंद पर्यायी राज्य मार्ग 178 राधानगरी, मुरगूड, निपाणी व प्रजिमा क्र. 51 लिंगनूर, कापशी, माध्याळ मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- अणदूर, मांडुकली, वेतवडे, गोटमवाडी, गोठे, प्रजिमा 25 वर 3 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी अणदूर, धुंदवडे रस्ता प्रजिमा 34 मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- बाजार भोगाव काऊरवडी, किसरुल, पिसात्री, कोलिक पडसाली रस्ता प्रजिमा 19 वर कासारी नदीचे 4 फुट पाणी आल्यानु वाहतुक बंद असून पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.

गगनबावडा- बाजार भोगाव काऊरवडी, किसरुल, पिसात्री, कोलिक पडसाली रस्ता प्रजिमा 19 वर मानवाड गावाजवळ ओढ्याचे पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.

गगनबावडा- बाजार भोगाव काऊरवडी, किसरुल, पिसात्री, कोलिक पडसाली रस्ता प्रजिमा 19 वर जांभळी नदीचे 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.

 गगनबावडा- कोपार्डे, पडळ, माजगाव, पोर्ले ते रा.मा.क्र. 191 ला मिळणारा प्र.जि.मा.क्र. 18 वर माजगाव पुल ॲप्रोच वर 4 फूट कासारी नदीचे पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी तिरपण, कोतोली मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड- कानूर, कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर, रामा क्र. 189 ला मिळणारा प्रजिमा क्र. 66 वर नांदुरे पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी रामा 180 ते कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकुर प्रजिमा 66 मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड- गुडवळे, खामदळे, हेरे, सावर्डे, कोळींद्रे, शिपूर, नांदवडे, करजगांव, हलकर्णी ते रामा क्र. 180 ला मिळणारा प्रजिमा क्र. 71 वर करंजगाव पूल किमी 11/400 वर 2 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी प्रजिमा 71 ते करंजगांव ग्रामा 95 ते प्रजिमा 76 ते रामा 189 मार्गे हेरे सावर्डे, नांदवडे प्रजिमा 71 मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड- पाटणे फाटा माणगाव, शिवणगे, म्हाळेवाडी, धुलेवाडी, निटटूर, कोवाड प्रजिमा 61 ला मिळणारा प्रजिमा क्र. 67 वर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी रामा 180 ते तांबुळवाडी, बागिलगे, डुक्करवाडी, माणगाव, ईजिमा क्र. 191 मार्गे वाहतुक सुरु आहे.

गडहिंग्लज- घटप्रभा नदीवर बंधाऱ्यावर 3 फुट पुराचे पाणी आल्याने बॅरेकेटींग लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रजिमा 64 पर्यायी मार्ग नेसरी हडलगे सांबरे मार्गे वाहतूक सुरु आहे. प्रजिमा 80 गडहिंग्लज गजरगाव महागाव मार्गे वाहतूक सुरु आहे.  प्रजिमा 56 रस्त्यावर 3 फुट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कडलगे चिकालगुड संकेश्वर मार्गे वाहतूक सुरु आहे. प्रजिमा 59 रस्त्यावर 2 फुट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.  कडलगे चिकालगुड संकेश्वर मार्गे वाहतूक सुरु आहे.

 शाहूवाडी प्रजिमा 1 वर (आरळा पूल) मध्ये वारणा नदीवरील पूलावर पाणी वाढत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. उखळू ते जिल्हा हद्द मार्के वाहतूक सुरु आहे.  प्रजिमा 3 नदीवरील पूलावर पाणी वाढत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. विरळे जांभूर ते सोडोली मार्गे वाहतूक सुरु आहे. 

 शिरोळ प्रजिमा 103 वर 2 फुट पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. नांदणी, जयसिंगपूर शिरोळ मार्गे वाहतूक सुरु आहे. 
          
 भुदरगड प्रजिमा 48 व म्हसवे ते दारवाड दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. 

  राधानगरी प्रजिमा 29 सावर्धन गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मिसाळवाडी जोंधळेवाडी दुर्गमानवाड तारळे प्रजिमा 41 मार्गे वाहतूक सुरु आहे.

 शाहूवाडी प्रजिमा 4 येळाणे कोपार्डे रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.  विरळे जांभूर ते सोडोली मार्गे वाहतूक सुरु आहे.  शिरोळ प्रजिमा 84 वर उदगांव ओढ्यामध्ये पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जयसिंगपूर उदगांव मार्गे वाहतूक सुरु आहे.

आजरा प्रजिमा 82  भादवण बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रजिमा 82 पेद्रेवाडी गावाजवळ ओढ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हाजगोळी मार्गे आजरा हत्तीवडे कानोली मार्गे वाहतूक सुरु आहे.

 शाहूवाडी शाळी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग नाही.  आजरा प्रजिमा 83 7/800 गजरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मलिग्रे कोवाडे पेद्रेवाडी भादवण मार्गे वाहतूक सुरु आहे. 

 हातकणंगले प्रजिमा 10 वारणा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कुंभोज दोनोळी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget