Kolhapur Crime: पोलिस ठाण्यासमोरच भरदिवसा कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी अभिषेक खांडेकर हे शिवाजी नगर पोलिस ठाण्यात जात होते. याचवेळी रावसाहेब गोसावी खांडेकर यांच्या अंगावर धावून गेला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
![Kolhapur Crime: पोलिस ठाण्यासमोरच भरदिवसा कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार Kolhapur Crime young man stabbed in the back with a knife cutter and blade in broad daylight in front of the police station Kolhapur Crime: पोलिस ठाण्यासमोरच भरदिवसा कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/18/a940c7422e55538da5620f19f3485d3f1687058816649369_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Crime: भरदिवसा थेट पोलिस ठाण्यासमोर तरुणावर कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) इचलकरंजी शहरात घडली. आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी जात असलेल्या तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. अभिषेक बजरंग खांडेकर (वय 21) हा गंभीर जखमी झाला आहे. विमल प्रकाश पाटील (वय 65) याही जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकवर इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रावसाहेब गोसावी, उमाजी गोसावी आणि अजय जुवे (रा. गोसावी गल्ली) यासह चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर किरकोळ कारणावरून संशयित रावसाहेब गोसावी व जखमी विमल पाटील यांच्यात वाद झाला. या वादात रावसाहेब याने वृध्द विमल पाटील यांना मारहाण केली. आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी अभिषेक खांडेकर हे शिवाजी नगर पोलिस ठाण्यात जात होते. याचवेळी रावसाहेब गोसावी पोलिस ठाण्याच्या बाहेरच्या मार्गावर खांडेकर यांच्या अंगावर धावून गेला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. रावसाहेबांसोबत आलेल्या अजय, उमाजीसह तिघांनी धारदार शस्त्रासह खांडेकर यांच्यावर हल्ला चढवला. तिघांनी कोयता, कटर, ब्लेडने खांडेकर यांच्या पाठीवर वार केले. आसपासच्या नागरिकांची गर्दी जमताच संशयित पसार झाले.
जुगार अड्ड्यावर छापा, दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी मारली, एकाचा मृत्यू
दरम्यान, कोल्हापूर शहरात रविवारी रात्री अकराच्या सुमारास आणखी एक धक्कादायक घटना घडली. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्या दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी मारली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला. साहिल मिनेकर असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर दत्तात्रय देवकुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. राजेंद्रनगरमध्ये परिसरात काल (18 जून) ही घटना घडली.
राजेंद्रनगरात एका दुमजली इमारतीमध्ये काही तरुण रविवारी रात्री जुगार खेळत होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अकराच्या सुमारास तिथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच तरुणांची पळापळ झाली. पोलीस पकडतील या भीतीने साहिल आणि दत्तात्रय या दोन तरुणांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली उडी मारली. मात्र दगडावर डोके आपटल्याने साहिल मिनेकरचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय देवकुळे हा तरुण जखमी झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)