एक्स्प्लोर

Kolhapur Crime: हातपाय बांधलेल्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ; घातपात की आत्महत्या याबाबत संभ्रम

नामदेव सणगर (वय 65) या शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहिरीत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली की घातपात याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. 

Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यामधील बहिरेश्वरमध्ये वयोवृद्ध शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. नामदेव सणगर (वय 65) या शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहिरीत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली की घातपात याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. 

पुतण्याला विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला 

मयत नामदेव सणगर हे घरी शेताला पाणी पाजून येतो असे सांगून शनिवारी रात्री घरातून बाहेर पडले होते. त्यांचे पुतणे नागेश सणगर सुद्धा शेतीला पाणी पाजण्यासाठी रात्री शेतावर पोहोचले. यानंतर त्यांनी विहिरीवरील मोटर सुरु करण्यासाठी गेल्यानंतर त्यांचे चुलते नामदेव सणगर विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यांनी तत्काळ नामदेव यांचा‌ मुलगा मनोहर सणगरला या घटनेची माहिती दिली. गावच्या पोलिस पाटलांनी करवीर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांचे दोन्ही पाय व डावा हात साडीच्या सहाय्याने बांधण्यात आला होता. 

पोलिसांनी श्नानपथकाला पाचारण केले होते, पण ते त्यांच्या घरापर्यंत जाऊन घुटमळले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यामुळे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होणार आहे. 

मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू

दरम्यान, मामाच्या गावी उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या अवघ्या 13 वर्षीय आदित्य शिवाजी पाटील या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील वेतवडेमध्ये घडली. तो पोहण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. आदित्य मूळचा गगनबावडा तालुक्यातील खेरीवडे असला, तरी तो सध्या पुण्यात राहत होता. 

आदित्य वेतवडेमध्ये मामाकडे उन्हाळी सुट्टीसाठी महिनाभर राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास वेतवडे येथील धामणी नदीत आंघोळीसाठी गेला होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तसेच पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने सर्वत्र त्याची शोधाशोध सुरू करण्यात आली. जनावरांना पाण्यासाठी घेऊन गेलेल्या एका व्यक्तीला नदीकाठी चप्पल व कपडे दिसल्याने तो या ठिकाणीच बुडाला असणार याचा अंदाज घेऊन गावातील तरुणांनी पाण्यात शोध सुरु  केला. अखेर सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget