एक्स्प्लोर

Kolhapur Crime : इचलकरंजीत भटकी कुत्री चावून माणसं 'पिसाळण्याची' वेळ आली; 5 महिन्यात 2 हजारांना चावा

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. मागील पाच महिन्यात दोन हजारांहून अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यात काहींचा मृत्यू झाला आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात (Ichalkaranji Crime) भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नागव्वा अर्जुन कांबळे असे त्यांचे नाव आहे. मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी सुमारे दोन ते अडीच तास लचके तोडल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. उपचारासाठी त्यांना आययजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कांबळे शुक्रवारी मध्यरात्री दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास शौचालयासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, पहाटे सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या आजूबाजूला भटकी कुत्री उभी होती. कुत्र्यांना हुसकावत नागरिकांनी त्यांना तत्काळ पहाटे पाचच्या सुमारास आयजीएम रुग्णालायत दाखल केले. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. धक्कादायक म्हणजे वृद्धेचे शवविच्छेदन सुरू असतानाच कुत्र्यांनी आणखी एका लहान मुलाचा लचका तोडल्याची घटना घडली. 

पाच महिन्यांत दोन हजारांवर घटना

आयजीएममधील नोंदीनुसार (Ichalkaranji Crime) पाच महिन्यांमध्ये दोन हजार नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक संघटनांनी आंदोलने सुद्धा केली आह मात्र महापालिका प्रशासन केवळ कायदा पुढे करीत पळवाट काढत आहे. शहरातील बहुतांश भागांत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. या आधी निष्फळ ठरलेल्या निर्बीजीकरण मोहिमेवर महापालिका भर देत आहे; पण, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखायचा कसा, याचे उत्तर मात्र प्रशासनाकडेही नाही.

कोल्हापुरातही प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य

दरम्यान, कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक नेहमीच पर्यटकांनी गजबलेला असतो. मात्र, त्याच बिंदू चौकात डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवडाभरात तीन पर्यटकांचा भटक्या कुत्र्यांनी लचका तोडला होता. कोल्हापूर शहराच्या (Kolhapur Crime) प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य आहे. वाहन वेगाने गेल्यानंतर कुत्री वाहनांचा पाठलाग करतात. बिंदू चौक, मटण मार्केट परिसरात कुत्र्यांच्या चांगल्याच टोळ्या आहेत. रात्री दहा ते पहाटेपर्यंत त्यांचा ठिय्या असतो.

ठिय्या मारुन कुत्री बसल्याने काही वेळेला चार चाकी वाहनधारकांना रस्त्यावरच थांबावे लागते. तसेच कचरा कोंडाळ्यासह मटण, चिकनची दुकाने, चायनीज दुकाने, कत्तलखाने परिसरात कुत्र्यांच्या झुंडींची दहशत आहे. चायनीजच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. चायनीजमधील कामगार जवळील कचरा कोंडाळी किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. शिल्लक अन्न, मांस, हाडे रस्त्याच्या कडेलाच टाकली जात असल्याने कुत्र्यांना हे खाद्य मिळते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget