Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा कहर सुरुच; गांधीनगरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन मुलांसह 14 जण जखमी
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव सुरुच आहे. इचलकरंजीमधील कुत्र्यांचा उच्छाद ताजा असतानाच आता गांधीनगरमध्ये (ता. करवीर) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जण जखमी झाले आहेत.
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Crime) पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव सुरुच आहे. इचलकरंजीमधील कुत्र्यांचा उच्छाद ताजा असतानाच आता गांधीनगरमध्ये (ता. करवीर) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जण जखमी झाले. शनिवारी (4 मार्च) दुपारी हा प्रकार घडला. जखमींवर गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांधीनगरातील मराठी शाळा, मोहिते मळा परिसर, शिरू चौक रोड भागातील लोकांवर या कुत्र्याने हल्ला केला.
गांधीनगरमध्ये वारंवार होणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे हल्ले स्थानिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. या हल्ल्यामध्ये चार महिला, तीन मुले आणि सात पुरुष असे एकूण 14 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला. गांधीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी वारंवार करूनही ग्रामपंचायत करते तरी काय? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
कोल्हापुरातही प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य
दरम्यान, कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक नेहमीच पर्यटकांनी गजबलेला असतो. मात्र, त्याच बिंदू चौकात डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवडाभरात तीन पर्यटकांचा भटक्या कुत्र्यांनी लचका तोडला होता. कोल्हापूर शहराच्या प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य आहे. वाहन वेगाने गेल्यानंतर कुत्री वाहनांचा पाठलाग करतात. बिंदू चौक, मटण मार्केट परिसरात कुत्र्यांच्या चांगल्याच टोळ्या आहेत. रात्री दहा ते पहाटेपर्यंत त्यांचा ठिय्या असतो.
इचलकरंजी भटक्या कुत्र्यांच्या वृद्धा मृत्यूमुखी
आठ दिवसांपूरर्वीच इचलकरंजी शहरात (Ichalkaranji Crime) भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. नागव्वा अर्जुन कांबळे असे त्यांचे नाव आहे. मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी सुमारे दोन ते अडीच तास लचके तोडल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. उपचारासाठी त्यांना आयजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे वृद्धेचे शवविच्छेदन सुरू असतानाच कुत्र्यांनी आणखी एका लहान मुलाचा लचका तोडल्याची घटना घडली होती.
पाच महिन्यांत दोन हजारांवर घटना
आयजीएममधील नोंदीनुसार (Ichalkaranji Crime) पाच महिन्यांमध्ये दोन हजार नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक संघटनांनी आंदोलनसुद्धा केलं आहे. मात्र महापालिका प्रशासन केवळ कायदा पुढे करीत पळवाट काढत आहे. शहरातील बहुतांश भागांत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. या आधी निष्फळ ठरलेल्या निर्बीजीकरण मोहिमेवर महापालिका भर देत आहे; पण, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखायचा कसा, याचे उत्तर मात्र प्रशासनाकडेही नाही.
महत्वाच्या इतर बातम्या :