Kolhapur KMT : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी केएमटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; पालकमंत्र्यांची भेट घेत मांडली व्यथा
कर्मचाऱ्यांकडून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे आदी मागण्यांसह सर्व कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur News) सलग दुसऱ्या दिवशी केएमटी कर्मचाऱ्यांचा (Kolhapur KMT) संप सुरूच आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी काल (1 डिसेंबर) रात्री प्रशासकांबरोबर झालेली बैठक देखील निष्फळ ठरली. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
दुसरीकडे, केएमटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी केएमटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांकडून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे आदी मागण्यांसह सर्व कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे बस वाहतूक खंडीत झाली आहे. त्यामुळे शहरवासियांची पायपीट सुरु आहे. प्रशासनाकडून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागण्या मान्य करा मगच संप मागे घेऊ, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या