एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शरद पवारांना भेटताच के. पी. पाटलांचा 180 डिग्रीचा टर्न, अजितदादांसोबत काडीचा संबंध नसल्याचा दावा

K P Patil : शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. के. पी. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असून या भेटीनंतर अजितदादांसोबत काडीचा संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. के. पी. पाटील (K P Patil) आणि ए.वाय. पाटील (A Y Patil) या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. हे दोन्ही नेते राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असून शरद पवारांच्या भेटीनंतर के. पी. पाटलांनी अजितदादांसोबत काडीचा संबंध नसल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.  

शरद पवार हे पुढील चार दिवस कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहेत. यादरम्यान ते कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची मोर्चेबांधणी करतील, असे बोलले जात आहे. भाजपचे नेते समरजित घाटगे (Samarjit Ghatge) हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर अजितदादा गटाचे के. पी. पाटील (K P Patil) हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी पंचशील हॉटेलवर दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ ए. वाय. पाटील (A Y Patil) यांनीही शरद पवारांची भेट घेतली. के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदरासंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते अजित पवार गटात होते. मात्र, या दोघांनी आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याची तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. 

अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला नाही : के पी पाटील 

शरद पवारांच्या भेटीनंतर माजी आमदार के पी पाटील म्हणाले की, मी अजित पवारांसोबत कधीच गेलो नाही. अजित पवार गटामध्ये मी कधी गेलोय, मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता.  मी पहिल्यापासून राष्ट्रवादीमध्येच आहे. मी कधीही अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला नाही. त्यामुळे पुन्हा पक्षप्रवेश करण्याचा प्रश्नच कुठे येतो. मी महाविकास आघाडीच्या सोबतच कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

शरद पवार मला उमेदवारी देतील : ए वाय पाटील

तर ए वाय पाटील म्हणाले की, मी गेली दहा वर्ष राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.  मात्र दोन वेळा मला शरद पवार साहेबांनी थांबायला सांगितले. नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी निवडणूक लढवायचं थांबलो. पण आता शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे मी ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. शरद पवार मला उमेदवारी देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता या दोन्ही नेत्यांमधून कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

शरद पवारांची गैबी चौकात 10 वर्षांनी सभा

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणाऱ्या समरजित घाटगे यांना गळाला लावून भाजपला मोठा धक्का दिला आहे. समरजीत घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दंड थोपटतील. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीत घाटगे तुतारी हाती धरतील. यानिमित्ताने तब्बल 10 वर्षांनी गैबी चौकात शरद पवार यांची सभा होणार आहे. 

आणखी वाचा 

Sharad Pawar: वस्ताद आज डाव दाखवणार! 10 वर्षांनी कोल्हापूरच्या गैबी चौकात शरद पवारांची सभा, आणखी दोन बडे मासे गळाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं  86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Sangli Election Result : सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
Embed widget