![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा; गेल्या 24 तासात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.41 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
![कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा; गेल्या 24 तासात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद Intense rain is very likely to occur at isolated places over Ghat areas of Kolhapur in next 3 hours कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा; गेल्या 24 तासात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/21/684bd2ad26cf3771228d255b199007531721553423554736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज (21जुलै) पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात एकूण 28.4 मिमी पाऊस झाला असून काल दिवसभरात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 58.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.41 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे
हातकणंगले- 15.6 मिमी, शिरोळ -7.1 मिमी, पन्हाळा- 29.1 मिमी, शाहूवाडी- 58.4 मिमी, राधानगरी- 29.4 मिमी, गगनबावडा- 35.6 मिमी, करवीर- 21.8 मिमी, कागल- 24.7 मिमी, गडहिंग्लज- 25.6 मिमी, भुदरगड- 41.4 मिमी, आजरा- 42.2 मिमी, चंदगड- 36.2 मिमी असा एकूण 28.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
राधानगरी 6.41 टीएमसी, तुळशी 2.33 टीएमसी, वारणा 24.57 टीएमसी, दूधगंगा 14.70 टीएमसी, कासारी 1.96 टीएमसी, कडवी 2.33 टीएमसी, कुंभी 1.70 टीएमसी, पाटगाव 3.2 टीएमसी, चिकोत्रा 0.82 टीएमसी, चित्री 1.66 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.23 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम 36.11 फूट, सुर्वे 35 फूट, रुई 64.11 फूट, इचलकरंजी 60.9 फूट, तेरवाड 53.9 फूट, शिरोळ 45.9 फूट, नृसिंहवाडी 44 फूट, राजापूर 33.5 फूट तर नजीकच्या सांगली 17.3 फूट व अंकली 21.8 फूट अशी आहे.
जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्यात?
- पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी
- ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगांव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी.
- वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व करडवाडी
- हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, विलजी, ऐनापूर, गिजवणे, जरळी व हरळी
- दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड व बाचणी.
- कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे
- वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव.
- भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व शिरगाव.
- कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व वेतवडे
- कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव,पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी-1 व नवलाचीवाडी-2
- धामणी नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी.
- तुळशी नदीवरील – बीड असे एकूण 79 बंधारे पाण्याखाली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)