एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार? अमित शाहांच्या उपस्थितीत होणार बैठक

Amit Shah In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे.

Maharashtra Cabinet expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Kolhapur) उद्या (19 फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात असणार आहेत.

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.  

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार करण्याकडे शिंदे फडणवीस सरकारचा विचार असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारच होत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिंदे गटामध्ये उत्साह संचारला असून त्यामुळे मंत्रिमंडळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अमित शाह उद्या कोल्हापुरात 

दुसरीकडे, अमित शाह यांची सासूरवाडी कोल्हापूर (Kolhapur News) आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अमित शाह यांचे कोल्हापूर कनेक्शन म्हणजे त्यांच्या पत्नी सोनल शाह या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. म्हणजेच अमित शाह कोल्हापूरचे जावईबापू आहेत. त्यामुळे होम मिनिस्टरांच्या आग्रहामुळे अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) कोल्हापूरमध्ये येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. लोहिया शाळेमध्ये शिकल्या आहेत. सोनल शाह यांचे पाहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले आहे. त्यामुळे आजही सोनल शाह आपल्या मित्र मैत्रिणींच्या संपर्कात आहेत. त्यांना आजही शाळेबद्दल आपुलकी आहे. त्यामुळे सोनल भाभी ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेच्या संस्थेचं यंदा शताब्दी वर्ष साजरे होत आहे.   

त्यामुळे दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सोनल भाभी यांनी अमित शाह यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे अमित शाह केंद्रीय होम मिनिस्टर असले, तरी घरच्या होम मिनिस्टरांचा आग्रह त्यांना मोडता आला नाही. त्यामुळे अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कौटुंबिक आणि भावनिक किनार आहे. या शाळेसाठी अमित शाह आणि सोनल शाह यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आहे. म्हणूनच शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाला अमित शाह यांच्यासारखा दुसरा पाहुणा नाही असे देखील मत शाळेने व्यक्त केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget