एक्स्प्लोर

बेदरकार क्रेट कारनं गरोदरपणाच्या टेस्टला जाताना बाप अन् कष्टानं शिकलेल्या वकील लेकीचा जीव घेतला, अवघ्या सात महिन्यांपूर्वी आईचं छत्र हरवलं; कोल्हापुरात शाहू मिल चौकात दोन कुटुंबाची क्षणात राखरांगोळी

गरोदरपणाची चाचणी करण्यासाठी वडिलांसोबत राजारामपुरी रुग्णालयामध्ये जात असतानाच दोघांवरही क्रेटाने काळाचा घाला घातला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सात महिन्यापूर्वी त्यांच्या आईचं सुद्धा निधन झालं होतं.

Kolhapur Shahu Mill Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये अवघ्या काही सेकंदामध्ये दोन कुटुंबांची राखरांगोळी झाली.  19 वर्षीय मयुरेश पाटीलने बेदरकारपणे क्रेटा कार चालवताना तब्बल सहा वाहनांना उडवल्याने दोघांचा जागीच अंत झाला, तर चार जण जखमी झाले. या अपघातात दीपक वंसे (66 वर्षे) आणि त्यांची मुलगी ॲडव्होकेट भाग्यश्री गवळी (27 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय अन्य 4 दुचाकीस्वार जखमी झाले असून, त्यापैकी केवल नाईक (23 वर्षे) आणि धनंजय करजगीकर (44 वर्षे) यांची प्रकृती गंभीर आहे.

अवघ्या सात महिन्यात कुटुंब उद्ध्वस्त 

भाग्यश्रीचा अवघ्या दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता आणि ती माहेरी आली होती. गरोदरपणाची चाचणी करण्यासाठी वडिलांसोबत राजारामपुरी रुग्णालयामध्ये जात असतानाच दोघांवरही क्रेटाने काळाचा घाला घातला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सात महिन्यापूर्वी त्यांच्या आईचं सुद्धा निधन झालं होतं. त्यामुळे अवघ्या सात महिन्यात एकाच कुटुंबातील आई वडील आणि गर्भवती मुलगी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. दीपक वंसे कोल्हापूर मनपातून निवृत्त झाले आहेत. त्यांना चार मुली होत्या. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by parshram patil ( aravind) (@parshrampatil)

 

नेमका अपघात कसा घडला?

१९ वर्षीय संशयित चालक मयुरेश पाटील आपल्या क्रेटाकारसह राजारामपुरीकडून कोटीतीर्थ तलावाच्या दिशेने अतिवेगाने जात होता. राजारामपुरी चौकात पोहचल्यावर चालकाने सुरुवातीला दोन वाहने आणि एका रिक्षाला धडक देऊन प्राथमिक अपघात केला. सदर रिक्षाचालकाने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, मयुरेशने वेग वाढवून शाहू मिल चौकाच्या दिशेने पलायन केले. कारचा वेग आणि धडक पाहून संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने पाठलाग सुरू केला. 

शाहू मिल चौकात नियंत्रण सुटले 

शाहू मिल चौकात पोहचताच अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मयुरेशने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना समोरासमोर भीषण धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार हवेत फेकले जाऊन रस्त्याच्या कडेला पडले आणि क्रेटा  दुभाजकाला धडकून पलटी झाली. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांची गर्दी जमली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेमार्फत सीपीआर (CPR) रुग्णालयात हलवण्यात आले. जिथं दीपक वंसे आणि भाग्यश्री गवळी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

कारचालकाला बेदम चोप 

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाने चालकाला वाहनातून बाहेर काढून मारहाण केली आणि त्यानंतर राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारमध्ये चालकासह आणखी एक अल्पवयीन मुलगा होता, जो अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, डीवायएसपी प्रिया पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे आदींनी घटनास्थळाचा पंचनामा करून तातडीने गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी चालक मयुरेशला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget