Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघातात बाप लेकीचा जागीच अंत; शाहू मिल चौकात भरधाव क्रेटा कारने सहा जणांना उडवलं
Kolhapur Accident : रेल्वे फाटक परिसरात केएमटीने धडक दिल्यामुळे दुचाकीवरुन जाणाऱ्या बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवार हा अपघात वार ठरल्याचं दिसून आलं. शाहू मिल चौकात झालेल्या अपघातात (Kolhapur Accident) बाप लेकीचा करुण अंत झाला. भाग्यश्री लक्ष्मण वंशे गवळी (वय 30) आणि दीपक महादेव वंशे (वय 65) अशी मृतांची नावं आहेत. दीपक महादेव वंशे हे नुकतेच कोल्हापूर महापालिकेतील आरोग्य विभागातून निवृत्त झाले होते. ते दिलबहार तालीम जवळ सनगर गल्लीत राहत होते. तर भाग्यश्री गवळीचा विवाह दीड वर्षांपूर्वीच झाला असून ती कसबा बावडा परिसरात राहत होती अशी माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये क्रेटाने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दूर उडून पडल्याने अत्यंत गंभीर जखमी झाले. त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
दरम्यान, उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात क्रेटा कार ही रस्त्याच्या मधोमध उलटी झाली होती. तर धडक दिलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला होता. रस्त्याच्या कडेला पडजागेत दुचाकीस्वार जाऊन कोसळले. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. यावेळी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करत जखमींना सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारावेळी दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी पलटी झालेली क्रेटा बाजूला करता वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी बघ्यांचा मोठा जमाव जमला होता.
ही बातमी वाचा:
























