Kolhapur Crime : आधी महिलेशी प्रेमसंबंध, नंतर तिच्याच अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अत्याचार; नराधम अटकेत
Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या कसबा बावड्यातील नराधमाला कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) बेड्या ठोकल्या.
Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या कसबा बावड्यातील नराधमाला कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. महेश संजय पाटील (वय 31) असे त्याचे नाव असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात (Kolhapur Crime) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धुणी भांडी आणि हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करते. संशयित आरोपीचे फिर्यादीशी प्रेमसंबंध होते. तसेच फिर्यादीची पीडित मुलगी अल्पवयीन असूनही तिच्याशी अश्लील वर्तन केले. अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असताना येऊन मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून अश्लील वर्तन करत होता. पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे.
संबंधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असल्याची माहिती एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर आवाज उठवत पोलिस अधीक्षकांना माहिती दिली. पीडित अल्पवयीन आणि तिच्या आईने सविस्तर माहिती दिल्यानंतर याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
मुलींना शाळेत अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या विकृत शिक्षकाला बेड्या
दरम्यान, राधानगरी तालुक्यातील (Kolhapur News) शेळेवाडीतील स्वामी विवेकानंद संस्थेच्या विद्यालंकार शाळेमध्ये शिक्षकानेच नववी आणि दहावीच्या वर्गातील मुलींना शिक्षकानं पॉर्न फिल्म दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मंगळवारी (31 जानेवारी) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. महिनाभरापूर्वी झालेला हा प्रकार सोमवारी समुपदेशन करताना गीता हसूरकर यांना पीडित मुलींनी धाडसाने माहिती दिल्यानंतर उघडकीस आला होता.
विजयकुमार परशुराम बागडी (वय 52, मुळगाव सोळांकूर, रा. फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) या शिक्षकाला शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भोपाल कोले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली. प्रकरण दडपून ठेवल्याने शाळेचे मुख्याध्यापक तसेच गावच्या सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
महिनाभरानंतर प्रकरण उजेडात
शाळेतील 15 ते 16 वयोगटातील सात मुलींसोबत महिन्यांपूर्वी धक्कादायक कृत्य झाल्याची माहिती ग्रामस्थांना लागली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेकडे तक्रार केल्यानंतर बागडीची तत्काळ बदली करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामस्थांना या विषयावर पडदा पडल्याचे वाटत होते. तथापि, समुपदेशन करण्यासाठी गेलेल्या समुपदेशक गीता हसुरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन बोलते केले, तेव्हा शोषण झालेल्या मुलींनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
इतर महत्वाच्या बातम्या