Kolhapur News : तोल जाऊन पीठाच्या बुट्टीत पडलेल्या नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा गुदमरून करुण अंत; कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. तोल गेल्यानंतर गव्हाच्या पीठाच्या बुट्टीत पडल्याने चिमुकल्याला दुर्दैवी करुण अंत झाला.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. तोल गेल्यानंतर गव्हाच्या पीठाच्या बुट्टीत पडल्याने चिमुकल्याचा गुदमरून (Suffocation After Falling Into Wheat Flour) दुर्दैवी करुण अंत झाला. कृष्णराज राजाराम यमगर (वय 9 महिने, रा. जुना वाशीनाका, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. करवीर तालुक्यातील वडणगेत काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. नऊ महिन्यांच्या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. दरम्यान, या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. चिमुकल्याला घरातील लोकांनी उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र, नाका-तोंडात पीठ गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
नेमका काय प्रसंग घडला?
जुना वाशीनाका येथील सुप्रिया राजाराम यमगर या मुलगा कृष्णराजला घेऊन वडणगेत आपल्या आजीकडे आल्या होत्या. संध्याकाळी कृष्णराज वॉकरमधून चालत असतानाच त्याचा गव्हाच्या पीठाच्या बुट्टीत तोल गेला. त्यावेळी कृष्णराजला आजीने बुट्टीतून (Suffocation After Falling Into Wheat Flour) बाहेर काढले. त्यावेळी कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ गेले होते. ते पीठ त्याच्या नाका-तोंडात चिकटून बसले. हे लक्षात येताच त्याला कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, चिकटलेल्या पिठामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता.
महत्वाच्या इतर बातम्या :