Kolhapur News : 1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन
आमदारांनी एकही आमसभा घेतली नसल्याने तालुक्याचा विकास रखडल्याचा आरोप नागरिकानी केला. 1600 कोटींचा निधी आणल्याचा दावा आमदार राजेश पाटील यांनी केला होता.
![Kolhapur News : 1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन If you bring 1600 crore funds, then give an account Jode Maro movement against MLA rajesh patil in chandgad kolhapur Kolhapur News : 1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/27/4c3b3ce22096c4d7d9d82dc2be0a00c81727416595814736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : गेल्या तीन आठवड्यांपासून जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यात्रा आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार राजेश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. अजित पवार यांचा दौरा होत असतानाच त्यांच्या आमदाराविरोधात आंदोलन होत आहे. अजित पवारांच्या चंदगड दौऱ्यापूर्वी चंदगडमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेचे चंदगड येथून थेट प्रक्षेपण. https://t.co/nMhNIKDDL8
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 27, 2024
आमदारांनी एकही आमसभा घेतली नसल्याने तालुक्याचा विकास रखडल्याचा आरोप नागरिकानी केला. 1600 कोटींचा निधी आणल्याचा दावा आमदार राजेश पाटील यांनी केला होता. त्यामुळे याचा हिशोब देण्याची मागणी करत याबाबतचे निवेदन तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले.
गडहिंग्लज तालुक्यात लाडक्या बहिणींशी संवाद साधणार
दरम्यान, अजित पवार आज गडहिंग्लज तालुक्यात लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा 21 वा दिवस आहे. अजितदादा आपल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. कोल्हापुरात अजित पवार यांचे दोन आमदार आहेत. यामध्ये कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
चंदगडची जागा अजितदादांकडेच राहणार?
महायुतीच्या जागावाटपानुसार विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असेल त्याच पक्षाला ती जागा दिली जाणार आहे. त्यामुळे चंदगडची जागा सुद्धा अजित पवार यांनाच मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना ही जागा मिळाल्यास राजेश पाटील हेच उमेदवार असतील.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)