एक्स्प्लोर
Advertisement
मोठी बातमी : अजब कारभार, दोन आयुक्तांचा एकाच महापालिकेत पदभार, दोघेही एकाचवेळी एकाच केबिनमध्ये!
इचलकरंजी महानगरपालिकेत आज सकाळी दोन आयुक्तांनी पदभार घेतला. आयुक्त केबिनमध्ये ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील यांनी दोघांनी एकदम आज सकाळी पदभार घेतला.
इचलकरंजी, कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेत (Ichalkaranji Municipal corporation) आज अजब कारभार पाहायला मिळाला. महानगरपालिकेत आज सकाळी दोन आयुक्तांनी पदभार घेतला. आयुक्त ओमप्रकाश दिवटे (Omprakash Divate) यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी पल्लवी पाटील (Pallavi Patil) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ओमप्रकाश दिवटे यांनी बदलली स्थगिती आणली. त्यादरम्यानच पल्लवी पाटील आयुक्त यांनी पदभार स्वीकारला होता. त्यामुळे आज दोन्ही आयुक्त एकाचवेळी महापालिकेत दाखल झाले.
आयुक्त केबिनमध्ये ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील यांनी दोघांनी एकदम आज सकाळी पदभार घेतला. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर सुद्धा पल्लवी पाटील पदभार सोडत नव्हत्या. दोन्ही आयुक्तांमध्ये पदभार घेताना वादावादी झाली. इतकंच नाही तर दोन्ही आयुक्तांनी एकमेकां शेजारी दोन खुर्च्या लावून कामकाज सुरू केलं. एक तासानंतर कागदपत्रे सादर केल्यानंतर पल्लवी पाटील यांनी आपला पदभार सोडला.
वरिष्ठांचा फोन आल्यानंतर पल्लवी पाटील यांनी महापालिकेतून जाण्यास पसंती दाखवली. तोपर्यंत त्यांनी ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील यांच्यात वादावादी झाली होती.
पल्लवी पाटील यांच्या निवडीला स्थगिती
दरम्यान महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने पल्लवी पाटील यांच्या नियुक्तीला नुकतीच स्थगिती दिली होती. तसंच ओमप्रकाश दिवटे यांची निवड कायम ठेवली होती. ओमप्रकाश दिवटे हे मागील वर्षापासून आयुक्त आणि प्रशासक म्हणून काम पाहात आहेत. मात्र त्यांची मुदतीआधीच बदली झाली. त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र दोन वर्ष आधीच बदली कशी काय झाली, असा प्रश्न उपस्थित करत ओमप्रकाश दिवटे मॅटमध्ये गेले होते. मॅटने दिवटे यांची बाजून ऐकून, त्यांच्या बदलीला स्थगिती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement