एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापुरात डा‌ॅल्बीने कान जाम अन् लेझर शोने 60 जणांच्या थेट डोळ्यावर 'वार'! इफेक्टशी जवळून संपर्क आलेल्यांचे धाबे दणाणले

गणेशोत्सवानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दृष्टीदोष जाणवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, कमी दिसणे असे 60 हून अधिक अधिकृत रुग्ण समोर आले आहेत.

Kolhapur Ganesh Immersion : तब्बल 28 तास डाॅल्बीचा अखंड दणदणाट आणि झगमगणारी लेझर लाईट यामध्ये कोल्हापूरमधील गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. ही मिरवणूक पाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला होता. कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्ष आनंदाला मुकलेल्या गणेश मंडळांनी यावेळी चांगलाच कहर केला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये उन्मादही दिसून आला.   

आता गणेशोत्सवानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दृष्टीदोष जाणवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. विशेषतः विसर्जन मिरवणुकीनंतर डोळ्यांमध्ये जळजळ होणे, कमी दिसणे असे 60 हून अधिक अधिकृत रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भीती कोल्हापुरातील नेत्ररोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

डोळ्यात जळजळणे, भाजल्यासारखे वाटणे यासारखे परिणाम 

याबाबत  नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभिजित तगारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या 10 दिवसांच्या गणपती उत्सवामध्ये तसेच आगमन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डाॅल्बी आणि लेझर शोचा वापर केला गेला. या मिरवणुकीमध्ये नाचगाणे केलेल्यांच्या अनेकांच्या डोळ्यावर लेझर किरणांचा परिणाम होऊन दुष्परिणाम झाले आहेत. 

काही लोकांमध्ये डोळ्यात जळजळणे, भाजल्यासारखे वाटणे यासारखे परिणाम दिसून आले आहेत. मात्र, काही लोकांच्या डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी किरण पडल्याने भयंकर मोठा दुष्परिणाम भोगावा लागला आहे. कोल्हापूरमध्ये आता 60 ते 65 रुग्ण आढळून आल्याचे तगारे यांनी सांगितले. मात्र, हा आकडा डाॅक्टरांकडे आलेला असून अजूनही त्रास होत असतानाही डाॅक्टरकडे गेलेले नाहीत, अशाचा आकडा मोठा असू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. 

उपचार करूनही धोका कायम राहण्याची शक्यता

डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव झाल्यानंतर नजर बंड पडल्याने या रुग्णांना उपचाराची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध उपचार करून घेण्यासाठी जवळपास 5 हजार ते 50 हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. परत उपचार करून त्रास होण्याची शक्यता ही राहतेच. त्यामुळे याचे भविष्यात आणखी काय परिणाम होणार आहेत, हे सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले. 

या दणक्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर शो समोर केलेला नाच अनेकांच्या अंगाशी आला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरात जशी विसर्जन मिरवणूक रंगली तशीच आगमन मिरवणूकही रंगली होती. या दोन्ही अनेक मंडळांनी डाॅल्बी आणि लेझर शोचा यथेच्छ वापर केला होता. या लेझर शो आणि अत्याधुनिक लाईट इफेक्टमुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याने मिरवणुकीत सहभागी झालेल्या आणि आणि इफेक्टशी जवळून संपर्क आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी : आमच्या सभेत मी रागातून बोललो, ती चूक झाली, हसन मुश्रीफांना उपरती, चंद्रकांत पाटलांच्या धमकीबद्दल म्हणाले...
आमच्या सभेत मी रागातून बोललो, ती चूक झाली, हसन मुश्रीफांना उपरती, चंद्रकांत पाटलांच्या धमकीबद्दल म्हणाले...
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget