Kolhapur Rain Update : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवार पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पंचांगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल चार फुटाने वाढली असून दुपारी चार वाजता 33 फुटाच्या वरुन पाणी वाहत आहे. पंचगंगा इशारा पातळीकडे (39 फुट) आगेकुच करु लागली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. दुसरीकडे धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असल्याने धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे.
Kolhapur Weather Update : कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट; अलमट्टी धरण 80 टक्के भरले #kolhapur #satara https://t.co/7UDZ1rA8r6
— ABP माझा (@abpmajhatv) July 19, 2024
राधानगरी धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा झाला असून आजपर्यंत (19 जुलै) 5.86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील जंगमहट्टी, घटप्रभा आणि जांबरे तीन लघू प्रकल्प यापूर्वीच भरले आहेत. कडवी धरण 85 टक्के भरले आहे, तर कासारी धरण 70 टक्के भरले आहे. दुसरीकडे, अलमट्टी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अलमट्टी धरण भरण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कोसळत असल्याने राधानगरीतून प्रतिसेंकद 1400, वारणातून 1546, कासारीतून 550, कुंभीतून 300, घटप्रभातून 6952 घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली?
- पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ, रुकडी, तेरवाड
- वारणा नदी- चिंचोली, माणगांव, तांदुळवाडी, खोची
- भोगावती नदी- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, शिरगाव
- कासारी नदी- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे,
- घटप्रभा नदी- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी
- हिरण्यकेशी नदी - साळगांव,
- ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर, माणगाव, न्हावेली
- दुधगंगा नदी- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत
- तुळशी नदी - बीड
- धामणी नदी - सुळे, पनोरे आंबर्डे, गवशे
- कुंभी नदी - कळे, शेनवडे, मांडूकली, सांगशी
- वेदगंगा नदी - निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी, म्हसवे
इतर महत्वाच्या बातम्या