एक्स्प्लोर

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे तांडव; पाटगाव, कुंभी धरण भरले, राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला, राजाराम बंधाराही पाण्याखाली

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. त्यामुळे भोगावती नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Kolhapur Rain : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरु आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कालपासून सुरु असलेल्या पावसाचा गणेश विसर्जन मिरवणुकीवरही परिणाम झाला. पावसाच्या सुरु असलेल्या तांडवामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ओढ्या, नाल्यांमध्येही पाणी ओसंडून वाहू लागले आहे. कोल्हापूर शहराला लागून असलेला कळंबा तलावही पुन्हा सांडव्यावरून वाहू लागला आहे. राजाराम बंधारा मोसमात चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. प पंचगंगेची पातळी बंधाऱ्यावर 17 फुटांवर पोहोचली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 13 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस होत असल्याने भरलेल्या धरणांमधून नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. त्यामुळे भोगावती नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून सध्या 3 हजार 28 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 

तुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्याने तुळशी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून तुळशी धरणातून सध्या असणारा 500 क्युसेक्स विसर्ग 300 ने वाढ करून 8000 क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदी काठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन बंधारे पाण्याखाली

दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने रुई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.   

पाटगाव, कुंभी धरण 100 टक्के भरले

पावसाचा जोर वाढल्याने पाटगाव आणि कुंभी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले, तर सायंकाळी चारच्या सुमारास कुंभी धरण 100 टक्के भरले. 

जिल्ह्यातील 9 धरणे 100 टक्के भरली

जिल्ह्यातील तुळशी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे धरण 100 टक्के भरले आहे.  

अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु 

पावसाचा जोर वाढल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून 52 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. हिप्परगी धरणातून विसर्ग सध्या बंद आहे. दुसरीकडे कोयना धरणातूनही विसर्ग बंद आहे. धरणात 2 हजार 469 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणात 100.70 टीएमसी पाणीसाठा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget