एक्स्प्लोर

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा कहर सुरुच; हातकणंगले तालुक्याला अक्षरश: झोडपले 

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाचे रौद्ररुप दिसून येत आहे. आज जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यासह अनेक गावांना पावसाने झोडपून काढले.

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पावसाचे रौद्ररुप दिसून येत आहे. आज जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यासह  अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने हाताला आलेली पिके जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रलयकारी पावसाने रेल्वेमार्गावरील अनेक भुयारी मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक खंडित झाली आहे. हवामान खात्याकडून आणखी चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. पहाटेपासून सुरु झालेल्या पावसाने सकाळी 10 वाजेपर्यंत झोडपून काढले. 

ढगफुटी सदृश्य पावसाने शिवारात पाणीच पाणी दिसून येत आहे. अनेक रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक गावातील मार्ग बंद झाले. इचलकरंजी -हातकणंगले मार्गावरील रेल्वेच्या दोन्ही भुयारी मार्गावर पाणी साचल्याने इचलकरंजी पेठवडगाव, पुणे ,मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. रुकडी, तारदाळ, माणगाववाडी रेल्वे भुयारी मार्गखालील वाहतूक बंद झाली आहे.

परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला जबर फटका बसला. पावसाने सोयाबीन भिजल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. आणखीन चार दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यातही सोमवारी हलका पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, आजरा, चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यासह अनेक ठिकाणी पाऊस झाला.

बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी

दुसरीकडे हवामान विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरण त्याच्या एकूण क्षमतेच्या 89.9 टक्के भरले असून 2 हजार 856 क्युसेक विसर्ग दूधगंगा नदीत होत आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी कोयना धरण एकूण क्षमतेच्या 99.3 टक्के भरले असले तरी विसर्ग सुरु करण्यात आलेला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget