Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 कोटी 41 लाख रुपये निधींची 66 कामे सुरु ठेवण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांची मान्यता
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने 2021- 22 मधील जिल्ह्यात स्थगिती दिलेली 6 कोटी 41 लाख रुपये निधीची 66 कामे सुरु ठेवण्यास आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मान्यता दिली.
Kolhapur News : डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने 2021- 22 मधील जिल्ह्यात स्थगिती दिलेली 6 कोटी 41 लाख रुपये निधीची 66 कामे सुरु ठेवण्यास आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मान्यता दिली.
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाची आढावा बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. बैठकीला कोल्हापूरहून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांच्यासह जिल्हा परिषद व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या 21 सप्टेंबर 2022 च्या पत्रान्वये सन 2020-21 मधील स्थगिती दिलेल्या 66 कामांना बैठकीत पालकमंत्री केसरकर यांनी मान्यता दिली. ते म्हणाले की, डोंगरी भागाच्या विकासासाठी आवश्यक असणारी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. तसेच जिल्ह्यातील 10 डोंगरी गटांसाठी डोंगरी विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय समिती गठीत करुन 2022-23 मधील कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, अशा सूचनाही केसरकर यांनी दिल्या.
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत 2021-22 मधील प्रशासकीय मान्यता दिलेल्या 229 कामांपैकी 66 कामांना स्थगिती होती. कामे सुरु ठेवण्यास मान्यता दिलेली ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. जिल्हा परिषदेंतर्गत अंगणवाड्या व इतर सर्वसाधारण कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या