एक्स्प्लोर

Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास

Gokul Election: गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वादानंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच समोर आलेल्या या हलाल प्रमाणपत्र मुद्द्यामुळे गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग चढला आहे.

Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ..याच गोकुळ दूध संघाने आपल्या उत्पादन विक्रीसाठी काढलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोकुळच्या उत्पादनासाठी खरंच हलाल प्रमाणपत्राची गरज आहे का? असा सवाल आता काही संघटनांनी उपस्थित केला. गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वादानंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच समोर आलेल्या या हलाल प्रमाणपत्र मुद्द्यामुळे गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग देखील चढला आहे.

2018 पासून गोकुळने हलाल प्रमाणपत्र काढल्याचं समोर 

कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून या गोकुळकडं बघितलं जातं. रोज जवळपास 17 लाख लिटर दूध संकलन आणि वर्षाकाठी कोट्यावधीची उलाढाल यामुळे गोकुळ हे जिल्ह्यातील एक प्रमुख सत्ता केंद्र आहे. या संघावर आपलं वर्चस्व राहावं यासाठी सगळ्याच प्रमुख नेत्यांची धडपड सुरू असते. एरवी टँकर, कमिशन, भ्रष्टाचार अशा स्वरूपाच्या आरोप प्रत्यारोपामध्ये असलेल्या गोकुळ दूध संघावर इतिहासात पहिल्यांदाच धार्मिक स्वरूपाचा आरोप होत आहे. गोकुळने आपल्या तूप, लोणी, दूध पावडरच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हलाल प्रमाणपत्र काढल्याची बाब समोर आली आहे. मार्च 2023 मध्ये काढलेले प्रमाणपत्र सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे. प्रमाणपत्राचा आधार घेत गोकुळ दूध संघाला हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का? असा सवाल काही संघटनांनी विचारला. गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांच्या काळातच हे हलाल प्रमाणपत्र काढल्याचा दावा देखील केला जात आहे. 

आखाती देशांमध्ये गोकुळच्या उत्पादनांना मागणी 

मार्च 2023 मध्ये काढलेलं हे हलाल प्रमाणपत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलं तरी प्रत्यक्षात 2018 पासून गोकुळने हे हलाल प्रमाणपत्र काढल्याचं समोर आलं आहे. आखाती देशांमध्ये गोकुळच्या उत्पादनांना मागणी आहे. मागणीचा पुरवठा करण्यासाठी हलाल पत्र बंधनकारक असल्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे प्रमाणपत्र काढलं होतं. शिवाय दर दोन वर्षांनी या प्रमाणपत्राचे नूतनीकरण होत असल्याची बाब देखील समोर आली आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक पुढे ढकलण्यात अपयश आल्यानेच काहींना असे तथ्यहीन मुद्दे काढावे लागत असल्याची टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत महिन्याभरापूर्वीच संपली आहे. मात्र, गोकुळमधील सत्ताधर्‍यांनी चुकीच्या पद्धतीने सभासद नोंदणी आणि गैरप्रकार केल्याचा आरोप करत प्रकाश बेलवाडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मुदत संपूनही गोकुळ दूध संघाचे निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आता 90 दिवसाच्या आत गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे हलाल प्रमाणपत्राचा मुद्दा समोर आला आहे. येणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत देखील हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. हलाल प्रमाणपत्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच गोकुळच्या दुधाला धार्मिक रंग चढला आहे.

हलाल म्हणजे काय? 

हलाल’ हा अरबी शब्द आहे. मुस्लिम किंवा इस्लाम धर्मानुसार हलाल म्हणजे वैध किंवा ज्याला मान्यता किंवा परवानगी आहे. इस्लाममध्ये हलाल आणि हराम या दोन संज्ञा आहेत. जसे हलालमध्ये धर्मानुसार मान्यता/परवानगी आहे आणि हराम (Haram) म्हणजे जे इस्लामला अमान्य किंवा निषिद्ध असलेल्या गोष्टी आहेत. हलाल किंवा हराम या केवळ खाण्या-पिण्यापुरत्या मर्यादित संकल्पना नाहीत. इस्लाममध्ये त्यांना जीवनशैलीशी जोडलं आहे. काय खाणं योग्य, काय अयोग्य हे हलाल किंवा हराम ठरवलं आहे, तसंच वर्तन, व्यसन, फसवणूक, दान, धर्म, दैनंदिन आचार-विचार हे सुद्धा हलाल-हरामशी जोडलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget