एक्स्प्लोर

Karnataka Politics : मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला

Karnataka Politics News : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्तानाट्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

Karnataka Politics News : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्तानाट्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या सगळ्यात आणखी एक नवा ‘फॉर्म्युला’ समोर आला असून राज्यात तब्बल 4 उपमुख्यमंत्री नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संभाव्य उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण-कोण? (Who is the race for potential Deputy CM)

सूत्रांच्या माहितीनुसार, दलित, ओबीसी, लिंगायत आणि अल्पसंख्याक समाजातून प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. दलित गटातूनजी.परमेश्वरा आणि प्रियांक खर्गे यांची नावं चर्चेत आहेत. ओबीसी गटातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांचं नाव पुढे आलं आहे. लिंगायत समाजातून M. B. पाटील आणि ईश्वर खांद्रे यांना संधी मिळू शकते. तर अल्पसंख्याक गटातून के.जे. जॉर्ज, यू.टी. खादर आणि जमीर अहमद खान यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

ब्रेकफास्ट मिटिंगमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, गुरुवारी बेंगळुरूमधील ‘कावेरी’ या सरकारी निवासस्थानी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात होणाऱ्या ब्रेकफास्ट मिटिंगमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नेतृत्व बदलाबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2025 मध्येही दोन्ही नेत्यांमध्ये अशीच चर्चित ब्रेकफास्ट डिप्लोमसी झाली होती. त्या वेळी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान पक्षाने एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.

डीके शिवकुमार यांना खुर्ची मिळेल का?

सूत्रांच्या दाव्यानुसार, राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचा सल्ला दिला असून डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे. बदल्यात सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका आणि त्यांचे पुत्र यतींद्र यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे.

याशिवाय, औपचारिक घोषणेपूर्वी सिद्धरामय्या हे मंत्र्यांसोबत आणि आमदारांसोबत डिनर बैठक घेऊ शकतात. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या उपस्थितीत याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, डीके शिवकुमार समर्थकांनी त्यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे पोस्टर्स आणि सोशल मीडियावर संदेश व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा -

Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget