एक्स्प्लोर

Gokul : काविळ होऊन पिवळं दिसत असल्यास काय करायचं? 'अमुल' वाढावयला हातभार लावत आहेत; अरुण डोंगळेंचा शौमिका महाडिकांवर पलटवार

Gokul : सत्ताधारी गटाकडून सभासदांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला, तर विरोधकांकडून ठरावधारकांना मत मांडू दिले गेले नाही, असा आरोप करण्यात आला.

कोल्हापूर : प्रचंड घोषणाबाजी आणि हुर्रेबाजीमध्ये गोकुळची (Gokul) आज (15 सप्टेंबर) वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या एका तासामध्ये गुंडाळण्यात आली. सत्ताधारी गटाकडून सभासदांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला, तर विरोधकांकडून ठरावधारकांना मत मांडू दिले गेले नाही, असा आरोप करण्यात आला. सभेला दुपारी एक वाजता झाली.  

वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात गोंधळामध्ये

प्रवेशद्वारावर ठराव पाहून सभासदांना सभा मंडपात सोडण्यात येत असतानाच जमलेल्या गर्दीने बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभेला सुरुवात होण्यापूर्वीच अनागोंदी निर्माण झाली. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात गोंधळामध्ये झाली. गोंधळामध्ये नेमकं काय चाललं आहे हेच कोणाच्या लक्षात येत नव्हते. घोषणाबाजी दोन्ही  गटांकडून गटाकडून करण्यात आली. यावेळी बॅनरही उंचावण्यात आले. विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक या सभासदांमध्ये उभारून होत्या.  त्या व्यासपीठावर गेल्या नाहीत. वार्षिक सभा तासात गुंडाळण्यात आल्यानंतर शौमिका महाडिक यांनी समांतर घेत असल्याचे जाहीर केले. 

काविळ होऊन पिवळं दिसत असल्यास काय करायचं

सभा पार पडल्यानंतर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी माध्यमांशी बोलताना शौमिका महाडिक यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचून दाखवण्यात आली. काही लोकांना सभाच चालू द्यायची नव्हती. सर्व विषय सभेत मंजूर झाले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी प्रश्न विचारायचे असतात. संचालकांनी नाही. असे असतानाही त्या प्रश्न विचारणार असल्याचे म्हणत होत्या. त्यांना जे जे प्रश्न उपस्थित करायचे आहेत त्यांनी ते बोर्ड मीटिंगमध्ये उपस्थित करावेत, असे अरुण डोंगरे यावेळी म्हणाले.

या ठिकाणी सभासदांना बोलायची संधी होती. काविळ होऊन पिवळं दिसत असल्यास काय करायचं? 'अमुल' वाढेल की नाही माहीत नाही. मात्र, अमुल वाढवायला हे लोक हातभार लावत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सभासदांनी बोलायचं असताना आवाज दाबण्याचा प्रश्नच येत नाही. बोर्ड मिटींगला सातत्याने त्या गैरहजर असतात, आमच्याकडे नोंद असल्याचे अरुण डोंगळे म्हणाले. सभेसाठी 5206 खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यासंदर्भात आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती, असे डोंगळे यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget