Gokul Annual Meeting : गोकुळच्या सभेपूर्वी पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या'; बॅरिकेट्स तोडून सभास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न, पोलिसांची पुरती दमछाक
Gokul Annual Meeting : आजवरची परिस्थिती पाहता पोलिसांकडून या सभेच्या ठिकाणी कडेकोट कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे.
कोल्हापूर : गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा एकदा 'ये रे माझ्या मागल्या' अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच सभास्थळी विरोधकांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली आहे. आजवरची परिस्थिती पाहता पोलिसांकडून या सभेच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे.
पोलिसांकडून ठराव पाहूनच सभासदांना सोडले जात असताना यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनागोंदी निर्माण झाली. या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी सभेसाठी झाली आहे. सभा दुपारी एक वाजता सुरु होणार आहे. त्यासाठी मागील तीन तासांपासून सभेच्या ठिकाणी ठराव पाहून सभासदांना सोडण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी सुरु असतानाच सभासदांनी लावलेले बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरुवातीलाच तणाव निर्माण झाला आहे. यावेळी लावण्यात मंडपाला लावलेल्या पत्र्यामधूनही सभासदांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झालेली गर्दी पाहता पोलिसांना त्यांना आवरण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या