Kolhapur Ganesh 2022 : पंचगंगा नदीत गणेश विसर्जन करणार नाही, पण मार्ग बदलू नका, गंगावेश परिसरातील मंडळांचा पवित्रा
Kolhapur Ganesh :आम्ही पंचगंगा नदीमध्ये गणेश विसर्जन करणार नाही, पण मार्ग बदलू नका अशी मागणी करत गंगावेश परिसरातील गणेशोत्सव मंडळ आक्रमक झाली आहेत. त्यांनी आक्रमक घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
Kolhapur Ganesh 2022 : गणेश विसर्जनासाठी पंचगंगा नदी मार्गाला परवानगी मिळावी यासाठी गंगावेश परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आक्रमक झाली आहेत. आम्ही पंचगंगा नदीमध्ये गणेश विसर्जन करणार नाही, पण मार्ग बदलू नका अशी मागणी करत आंदोलनासाठी स्थानिक मंडळी रस्त्यावर उतरली आहेत.
दरम्यान, शाहू स्मारकमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी तीन मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. वेळेचे बंधन प्रत्येक मंडळावर असेल. पंचगंगा नदीमध्ये बाप्पाचे विसर्जन केले जाणार नाही. इराणी खाणीमध्येच गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व गणेश मंडळांना बोलवून मिरवणुकीचे तीन मार्गे सांगण्यात आले. त्या त्या भागातील मंडळांनी दिलेल्या मिरवणूक मार्गानेच बाप्पाची गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याची आहे. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय रहावा यासाठीचे हे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून मिरणवणुकीसाठी जे दोन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत त्या मार्गावरून जाण्यास बहुतांशी मंडळांनी मान्यता दिली आहे. ज्यांना पर्यायी मार्ग मान्य नसेल त्या मंडळांना महाद्वार रोडवरून जाण्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून चिठ्या काढून प्रवेश देण्यात येणार आहे.
पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असा असेल
- खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर, क्रशर चौक
पर्यायी मार्ग
- सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक, क्रशर चौक, इराणी खाण
- उमा टॉकीज, काॅमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर, क्रशर चौक