(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satej Patil : राज्यात पहिल्यांदाच कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, गृह मंत्रालय फेल; सतेज पाटलांचा हल्लाबोल फडणवीसांवार हल्लाबोल
Satej Patil on Devendra Fadnavis : आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलायचं काम सुद्धा घेतला असून हे सर्व महाराष्ट्राची जनता बघून घेत असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली.
Satej Patil on Devendra Fadnavis : राज्यात पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. बदलापूर, मालवणचे आरोपी सापडत नाहीत. पुण्यात राजरोसपणे खून होत आहेत, परवा कोयता गँगने पोलिसांवर हल्ला केला, राज्यात पहिल्यांदाच कायदा आणि सुव्यवस्थेचा ढासळली असून गृह मंत्रालय फेल गेलं असल्याची सडकून टीका माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केली. छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीवरूनही पाटील यांनी फडणवीसा यांच्यावर तोफ डागली.
ज्याबद्दलचे इतकं प्रेम आहे की उद्योग घेऊन जात आहेत
सतेज पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं काम सुरू आहे. सर्व इतिहासकारांनी सांगितलं त्यांचा इतिहास कच्चा असल्याचे सांगितलं आहे. इतिहासाचे अनेक दाखले पाहिल्यानंतर खरा इतिहास लोकांसमोर आला आहे. त्यांना राज्याबद्दलचे इतकं प्रेम आहे की उद्योग घेऊन जात आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलायचं काम सुद्धा घेतला असून हे सर्व महाराष्ट्राची जनता बघून घेत असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली.
केवळ माफीने काही होणार नाही
शिवरायांच्या पुतळा प्रकरणाबाबत माफी मागून चालणार नाही शिक्षा झाली पाहिजे, असे मागणी पाटील यांनी केली. ते म्हणाले की, कारण ज्या चुकीमुळे संपूर्ण जगभर नाचक्की झाली असून केवळ माफीने काही होणार नाही.
महायुती निवडणूक पुढे ढकलेल असं वाटत नाही
सतेज पाटील म्हणाले की, महायुती निवडणूक पुढे ढकलेल, असं वाटत नाही. निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा फायदा आम्हालाच होईल. महायुतीमधील जागावाटपाबाबत भांडण समोर येत आहे. महाराष्ट्रातील सरकार हे जनतेला पटलेलं नसल्याचे ते म्हणाले. घटनेच्या विरोधातलं सरकार हे जनतेला पटलेलं नसल्याचे टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना फोडण्याचे पाप यांनी केलं आहे. लोकांच्या मनात काय भावना आहेत ते निवडणुकीत दिसेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी काही जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये अद्याप चर्चा नसल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चर्चेनुसार कागलची जागा राष्ट्रवादीला सुटली असेल, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या