Bhogawati Sakhar Karkhana: 'बिद्री'ची निवडणूक लांबणीवर टाकली, पण जुलै महिन्यातील भर पावसात भोगावती कारखान्याची निवडणूक जाहीर!
भोगावती कारखान्यासाठी उद्यापासून (20 जून) रणधुमाळी सुरु होत आहे. 30 जुलै रोजी मतदान होणार असून 31 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्यक्ष प्रचारासाठी अवघा 13 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
Bhogawati Sakhar Karkhana: कोल्हापूर जिल्ह्यातील ब्रिदी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पावसाळ्याचे कारण सांगून लांबणीवर पडली असतानाच भोगावती सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम मात्र जाहीर झाला आहे. भोगावती साखर कारखान्यासाठी (Bhogawati Sakhar Karkhana) उद्यापासून (20 जून) रणधुमाळी सुरु होत आहे. 30 जुलै रोजी मतदान होणार असून 31 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्यक्ष प्रचारासाठी अवघा 13 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाॅ. पी. एल. खंडागळे यांनी कारखाना निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलकंठ करे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जुलैमध्येच निवडणूक, राजकीय भुवया उंचावल्या
भोगावती कारखान्याचा (Bhogawati Sakhar Karkhana) कार्यक्षेत्रामध्ये होणारी अतिवृष्टी आणि पूरस्थिती विचारात घेता ही निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण थेट आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा दणका पाहता आणि राधानगरी आणि करवीर तालुक्यातील परिस्थिती पाहता सभासदांची आणि नेत्यांची मोठीच कसरत असणार आहे. बिद्रीची निवडणूक पावसाचे कारण देऊन लांबणीवर टाकण्यात आली असेल, तर भोगावती कारखान्याच्या निवडणुकीवेळी पाऊस 'उपवास' करणार आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
भोगावती कारखाना निवडणूक कार्यक्रम
- 20 ते 27 जून अर्ज दाखल करणे
- 29 जूनला अर्जांची छाननी
- 30 जून रोजी पात्र उमेदवाराची यादी जाहीर होणार
- 14 जुलै उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस
- 17 जुलै अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध व चिन्ह वाटप
- 30 जुलै रोजी 8 ते 5 या वेळेत मतदान
- 31 जुलै रोजी मतमोजणी
कारखान्यासाठी 27 हजार 561 सभासद पात्र
दरम्यान, भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या (Bhogawati Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांकडून हरकत घेण्यात आली होती. याबातची सुनावणी झाल्यानंतर हरकती फेटाळून अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये राधानगरी व करवीर तालुक्यातील 27 हजार 561 मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 14 हजार 255 अ वर्ग तर 277 ब वर्ग असे 14 हजार 532 सभासद आहेत. तर करवीर तालुक्यातील 12 हजार 810 अ वर्ग, 217 ब वर्ग तर व्यक्ती सभासद 2 असे 13 हजार 29 सभासद पात्र आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या