एक्स्प्लोर

Dhananjay Mahadik on Shahu Maharaj : खासदार धनंजय महाडिकांनी मंडलिकांच्या पराभवाची कुंडलीच मांडली; कोल्हापुरात शाहू महाराज निवडून आले कारण....

महायुतीला कोल्हापुरात फटका बसल्यानंतर बैठक पार पडली. या बैठकीत संजय मंडलिक यांच्या पराभवाचे आकलन करण्यासह महायुतीच्या माध्यमातून कसं काम केले पाहिजे याबाबत चर्चा झाली.

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी (Dhananjay Mahadik on Shahu Maharaj) पराभवाची कुंडलीच मांडली. पक्षांतर्गत कुरघोड्यांसह कोणत्या कारणांमुळे पराभवाचा फटका बसला, याबाबत त्यांनी भाष्य केले. महायुतीला कोल्हापुरात फटका बसल्यानंतर बैठक पार पडली. या बैठकीत संजय मंडलिक यांच्या पराभवाचे आकलन करण्यासह महायुतीच्या माध्यमातून कसं काम केले पाहिजे याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी सुद्धा चर्चा करण्यात आल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले. 

धनंजय महाडिक यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या निकालाचे चित्र संपूर्ण देशभरामध्ये असून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी समीकरणे होती. समस्या वेगळ्या होत्या. घटक पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोड्या सुद्धा होत्या. राज्यात महायुतीला फटका बसल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. महाराष्ट्रात मराठा आंदोलन, शेतमालाचा दराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग पराभवाची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. 

शाहू महाराजांबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांना आदर

ते पुढे म्हणाले की सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरात शाहू महाराज उमेदवार असल्याने महायुतीला फटका बससा. शाहू महाराजांबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांना आदर आहे, याचाच फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यामुळे आम्हाला संजय मंडलिकेचा पराभव मान्य असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले. दरम्यान भविष्यात चिंतन करून कोल्हापूर जिल्ह्यात महायुती कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर आरोप केला. ते म्हणाले की काँग्रेसने देशावर 68 वर्ष राज्य केले. काँग्रेसने नॅरेटिव्ह  सेट करण्यात चॅम्पियन आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने महागाई आणि संविधान बदलणार हे मोठ्या प्रमाणात वापरल्याचा परिणाम मतदारांवर झाला. निवडणूक नेहमी जनतेच्या हातामध्ये असते. कारण देशभरात जवळपास 19 मंत्र्यांचा पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget