एक्स्प्लोर

Kolhapur Lok Sabha Result 2024 : समतेचा बुलंद आवाज दिल्लीत घुमणार! कोल्हापूरकरांचा मान आणि मत गादीलाच; शाहू छत्रपतींचा थाटात विजय

Kolhapur Lok Sabha Election Result : कोल्हापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा दीड लाखांवर मताधिक्याने पराभव केला.

कोल्हापूर : जागावाटपात कोल्हापूरची (Kolhapur Loksabha) जागा खेचून आणल्यानंतर तितक्याच ताकदीने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी विजय सुद्धा खेचून आणला आहे. कोल्हापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा दीड लाखांवर मताधिक्याने पराभव केला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतेज पाटील (Satej Patil) यांनी उमेदवारी देण्यापासून ते विजय मिळेपर्यंत राबवलेली निवडणूक मॅनेजमेंट मोलाची ठरली. त्यामुळे निवडणुकीत सर्वाधिक चर्चित झालेली मान आणि मत कोणाला याचाही फैसला झाला असून मान आणि मत कोल्हापूरकरांनी गादीलाच देत शाहू महाराज यांना दिल्लीत पाठवलं आहे. 

कोल्हापुरात रमणमळा येशील शासकीय गोदामात मतमोजणी पार पडली. शाहू महाराज यांनी पोस्टल मतदानापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. शाहू महाराज राधानगरी भुदरगड तालुक्यामधील जनतेनं साथं दिल्याने मतदानातून स्पष्ट झालं आहे. संजय मंडलिक यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कागल, चंदगड आणि गडहिंग्लजमधूनही त्यांना अपेक्षित लीड मिळालेलं नाही.  

शाहू महाराज यांच्या विजयासाठी काँग्रेसने संपूर्ण यंत्रणा राबवली होती. तसेच राजर्षी शाहूंचा वारसदार थेट रिंगणात असल्याने वंचित बहुजन आघाडीस अनेक सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे उमेदवार रिंगणात 23 असूनही वन टू वन लढत झाली. यामध्ये शाहू महाराज सरस ठरले. कोल्हापूर मतदारसंघात वाढलेली काँग्रेसची ताकद सुद्धा निर्णायक ठरली. शाहू महाराजांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत शिव शाहू निर्धार सभा घेण्यात आली होती. दुसरीकडे, संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. मात्र, मोदींच्या सभेचा कोणताही परिणाम झालेला नाही. 

करवीरमध्ये शाहू महाराजांना लीड, पण पी. एन. पाटील हयात नाहीत 

दरम्यान, करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील नेतृत्व करत होते. मात्र, 19 मे रोजी बाथरुममध्ये पडल्यानंतर चार दिवस त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. 23 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे काँग्रेसला निष्ठावंत शिलेदार हरपल्याने मोठा झटका बसला आहे. करवीरमध्ये 78.89 टक्के मतदानाची नोंद झाली होती. हेच मताधिक्य शाहू महाराज यांच्यासाठी निर्णायक ठरले. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात कोल्हापूर शहर आणि उपनगरे सामावली गेली आहेत. नजीकची खेडी सुद्धा या दोन्ही मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा चुरशीने मतदान झाले होेते.  कोल्हापूर उत्तर मध्ये 64.54 टक्के मतदानाची नोंद झाली, तर कोल्हापूर दक्षिण मध्ये 69.80 टक्के मतदानाची नोंद झाली. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

  • कोल्हापूर दक्षिण - आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेस
  • कोल्हापूर उत्तर - आमदार जयश्री जाधव, काँग्रेस 
  • करवीर - स्वर्गीय पी. एन. पाटील, काँग्रेस 
  • राधानगरी भुदरगड - आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना शिंदे गट
  • कागल - आमदार हसन मुश्रीफ, अजित पवार गट
  • चंदगड - आमदार राजेश पाटील, अजित पवार गट 

दोन्हीकडून ताकदीने प्रचार

कोल्हापूर लोकसभेसाठी करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकारणाचा कल बदलून गेला होता. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार होते. संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या एक महिन्यात तब्बल चार वेळा कोल्हापूरचा दौरा करत कोल्हापूर आणि हातकणंले या दोन्ही मतदारसंघांसाठी जोडण्या केल्या. कोल्हापुरातील आजी-माजी नगरसेवक, साखर कारखाने, गोकुळ ते सहकारी संस्थापर्यंत अनेकांशी थेट संपर्क साधत संजय मंडलिक यांच्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

त्यामुळे या सर्व जोडण्याचा परिणाम किती होतो हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे शाहू महाराजांच्या प्रचाराची संपूर्णतः जबाबदारी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याच खांद्यावर होती. शिवशाहू निर्धार सभा गांधी मैदानात शाहू महाराजांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली. या सभेसाठी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. या सभेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती होती. महाविकास आघाडीच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा मतदारसंघात शाहू महाराजांचा प्रचार केला आहे. कोल्हापूरसाठी छत्रपती शाहू घराणे हा अत्यंत नाजूक मुद्दा असल्याने त्याचा प्रभाव मतदानामध्ये दिसून आल्याची चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget