एक्स्प्लोर

CM Ekanath Shinde : नंबर एक शत्रू कोण विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित सुमंगलम लोकोत्सवाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भय्याजी जोशी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

CM Ekanath Shinde : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित सुमंगलम लोकोत्सवाचे उद्धाटन (Sumangalam Lokotsav) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. महोत्सवाचे उद्धाटन झाल्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी महोत्सवाची प्रशंसा करताना सेंद्रीय शेतीला प्रोत्साहान देणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेचाही यावेळी उल्लेख केला.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लोकोत्सवाचे कौतुक केले. मात्र, उभय कार्यक्रमात बोलताना राजकीय वक्तव्यांना फाटा दिला. 

शुभारंभ कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते. यावेळी राजकीय एक नंबर शत्रू, दोन नंबर शत्रू कोण अशी चर्चा सुरु आहे. याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. यावेळी कोणतेही थेट उत्तर न देता हात जोडले व  महोत्सवाचे महत्व सांगून वेळ मारून नेली.   

हसत हसत मूळ प्रश्नाला बगल

मुख्यमंत्री हसत हसत मूळ प्रश्नाला बगल देत म्हणाले की, पंचमहाभूत वाचली पाहिजेत. आयोजित केलेला पंचमहाभूत महोत्सव ही काळाची गरज आहे. ग्लोबल वाॅर्मिग, क्लायमेट चेंज, अतिवृष्टी हे समोर येणारे धोके आहेत ते टाळण्यासाठी स्वामीजींनी  भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. पर्यावरण चांगलं झालं पाहिजे, विषमुक्त शेती झाली पाहिजे. सेंद्रीय शेती केली पाहिजे, गटशेती केली पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो. हा विषय तुम्ही घराघरात पोहोचवा. 

लोकोपयोगी स्टॉलची पाहणी  

दरम्यान, लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली. कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर, महसूल विभागाकडून उभारण्यात आलेल्या स्टॉलचे दीपप्रज्वलन तर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे फित कापून या दोघांच्या हस्ते औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला दोघा मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला. हवामान बदलाचे परिणाम, कारणे व उपाय या अनुषंगाने या स्टॉलवर माहिती देण्यात येते तर महसूल विभागाच्या स्टॉलवर विविध दाखले, फेरफार, नोंदणी आदींची सविस्तर माहिती या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या स्टॉलच्या उभारणीबद्दल मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले. 

एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या 'पंचमहाभूत बोध' या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भैय्याजी जोशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, योगेश जाधव, हिंदुराव शेळके, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हळवणकर, समरजीतसिंह घाटगे, विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी 'पंचमहाभूत संरक्षणाची शपथ' उपस्थितांना दिली.

काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेल्या या प्रयोगाचे (कलाकृती) मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 50 कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्व, त्यांच्यावर होत असलेले अपायकारक परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेल्या बदलांचा संदेश 'पंचमहाभूत बोध' प्रयोगातून देण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget