एक्स्प्लोर

Eknath Shinde In Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिस प्रशासनाकडून वाहतूक मार्गात बदल, पार्किंग 'या' ठिकाणी असेल

शासन आपल्या दारी कार्यक्रम कोल्हापुरात उद्या, 13 जूनला होत आहे. तपोवन मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

Eknath Shinde In Kolhapur: शासन आपल्या दारी कार्यक्रम कोल्हापुरात उद्या 13 जूनला होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी हा कार्यक्रम राज्य सरकारकडून घेतला जात आहे. हा कार्यक्रम कळंब्यातील तपोवन मैदानात होत आहे. यासाठी तपोवन मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला असून उद्या सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तपोवन मैदानात या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. साई मंदिर कळंबा, संभाजीनगर येथून सर्वांना प्रवेश बंद केला जाणार आहे. 

  • भुदरगडकडून कोल्हापूर शहरात येणारी सर्व अवजड व छोट्या वाहनांनी साई मंदिर कळंब्यातून डावीकडे वळण घेऊन चित्रा बाजार मार्गे क्रशर चौक, रंकाळा टॉवर, गंगावेश, छत्रपती शिवाजी पूल या मार्गावरून वळवली जाणार आहेत. 
  • राधानगरीकडून नवीन वाशी नाका मार्गे येणारी सर्व वाहतूक क्रशर चौक, रंकाळा टाॅवर, गंगावेश, छत्रपती शिवाजी पूल या मार्गाने वळवली आहे.
  • रत्नागिरी रोड वरून येणाऱ्या वाहनांना वडणगे फाट्याजवळ अडवून ही वाहतूक वडणगे, शिये, भूये आदी मार्गाने वळवण्यात येईल. 

पार्किंग या ठिकाणी असेल

  • दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कळंबा भाजी मंडई, कळंबा साई मंदिर ते चिवा बाजार रोडच्या दोन्ही बाजूस, तपोवन मैदान पार्किंग, संभाजीनगर डेपो, निर्माण चौक, क्रीडा संकूल एनसीसी आॅफिस या ठिकाणी एसटी बसेससाठी पार्किंग असेल. 
  • दरम्यान, कळंबा जेल क्वार्टरमागील बाजू, कळंबा कारागृह दक्षिण बाजू, कलानिकेतन विद्यालय, तपोवन मैदान पश्चिम बाजू, संभाजीनगर बसस्थानक, आयसोलेशन हॉस्पिटल आणि आयटीआय याठिकाणी दुचाकींसाठी पार्किंग असेल. 

सांगलीतून 100 बसेस कोल्हापुरात 

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरमध्ये उद्या 'शासन आपले दारी 'हा  कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रम ठिकाणी आणण्यासाठी बसेसची मदत घेतली जात आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील जवळ्पास 10 डेपोतून 100 बसेस कोल्हापूरला जात आहेत. सांगली आगारातून आजच 100 बसेस कोल्हापूरला होणार रवाना होणार आहेत. सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगांव, विटा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळा, पलूस या आगारातून बसेस कोल्हापूरला जात आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget