एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ajit Pawar: अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराची भीमगर्जना

वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी भीमगर्जना केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकसंध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

Rajesh Patil on Ajit Pawar: वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी भीमगर्जना केली आहे. अजितदादांना (Rajesh Patil on Ajit Pawar) मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. राजेश पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात अनेक वादळं येणार आहेत. ही वादळं थोपवण्याची कामं आपल्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करायची आहेत. तुम्ही माझा 56 वा वाढदिवस साजरा केला, पण मी याठिकाणी सांगू इच्छितो जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री करत नाही, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत राजेश पाटलांचा वाढदिवस साजरा करायचा नाही, अशी शपथ घेऊया. लोकांना अशा प्रकारे त्रास देणार नाही. 

त्यांनी पुढे सांगितले की, अशा पद्धतीने वाढदिवस साजरे केल्यानंतर विरोधक जागृत होतात. आज आपण शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिला आहात ही एकी टिकवून ठेवायची आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकसंध राहण्याचे आवाहन राजेश पाटील यांनी केले. शरद पवार यांनी भाकरी परतली पण चंदगड विधानसभेची भाकरी परतू नका म्हणत कार्यकर्त्यांना सोबत राहण्याचे आवाहन केले. 

कागलच्या पुढे राष्‍ट्रवादी नेण्याचा प्रयत्‍न करा

दरम्यान, मागील महिन्यात अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात कागलमध्ये मेळावा घेत पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या‍ जिल्‍ह्यात राष्‍ट्रवादी काँग्रेसची अवस्‍था दयनीय आहे. एकेकाळी पाच आमदार आणि दोन खासदार देणाऱ्या‍ जिल्‍ह्यात पक्षाचे केवळ दोन आमदार आहेत. अनेक तालुक्यांत पक्षाची ताकद नाही, हे बरोबर नाही. आता कागलच्या पुढे राष्‍ट्रवादी नेण्याचा प्रयत्‍न करा, असे सांगत अजित पवार यांनी राष्‍ट्रवादीच्या नेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते. 

अजित पवार म्‍हणाले होते की, राष्‍ट्रवादीची स्‍थापना जिल्‍ह्यात झाली. त्यावेळी मोठी ताकद होती. ही ताकद वाढणे अपेक्षित होते. मात्र, उलट परिस्‍थिती आहे. ही ताकद वाढविण्यासाठी जनतेचे प्रश्‍‍न हातात घेतले पाहिजेत. रस्‍त्यावर उतरून आंदोलने केली पाहिजेत. लोकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. केवळ पोस्‍टर लावून आणि घोषणा देऊन पक्ष वाढत नाही. चांगले काम केले तर लोक तुम्‍हाला नक्‍कीच निवडून देतात. जिल्‍ह्यात पक्षाचा पालकमंत्री असेल तर ताकद मिळते. राष्‍ट्रवादीच्या स्‍थापनेवेळी ते शक्य होते. पतंगराव कदम यांना संधी मिळाली. तेथून काँग्रेस पुढे गेली. आता परत स्‍थानिक स्‍वराज्य संस्थांत राष्‍ट्रवादीला एक नंबरचा पक्ष बनवा. मग जागा वाटपात काय करायचे, ते मी बघतो. यात मी वस्‍ताद आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

Kolhapur News: आई गेल्याचं समजताच मुलानंही दुसऱ्याच दिवशी जीव सोडला; कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget