Bidri Sakhar Karkhana Final Result : बिद्रीत केपींच्या 'लई भारी' कारभाराला सभासदांची पोचपावती; सत्ताधारी आघाडीकडून आबिटकर-मंडलिक-घाटगे गटाचा सपशेल धुव्वा!
बिद्री साखर कारखान्याच्या (Bidri Sakhar Karkhana) निवडणुकीत सत्ताधारी के. पी. पाटील गटाने बाजी मारली. सर्व जागांवर विजय मिळवत प्रकाश आबिटकर-संजय मंडलिक- समरजितसिंह घाटगे गटाचा सपशेल धुव्वा उडवला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) गेल्या काही महिन्यांपासून अगदी घराघरात चर्चेचा विषय झालेल्या कागल (Kagal) तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याच्या (Bidri Sakhar Karkhana Final Result) निवडणुकीत सत्ताधारी के. पी. पाटील गटाने बाजी मारली आहे. सर्व 25 जागांवर एकहाती विजय मिळवत प्रकाश आबिटकर-संजय मंडलिक- समरजितसिंह घाटगे गटाचा सपशेल धुव्वा उडवला. विरोधी आघाडीने जोरदार लढत दिली, पण सभासदांनी केपींना पुन्हा एकदा विश्वास दिला आहे.
ए. वाय. पाटील, अर्जुन आबिटकर यांना पराभवाचा धक्का
दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा निर्माण झालेल्या बिद्रीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली आहे. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने 25 पैकी 25 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे साडे पाच हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव केला. विरोधी गटाकडून कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संचालक बाबासाहेब हिंदुराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांना पराभव पत्करावा लागला.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी व विरोधी आघाडीने कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यात जोरदार प्रचार केला होता. मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील हे दोघे या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने उभे ठाकले होते. मुश्रीफांनी सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व केले. तर मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी आघाडीने ही निवडणूक लढविली. बिद्रीसाठी एकूण 56 हजार 91 सभासदांपैकी 49 हजार 940 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. राधानगरी तालुक्यातील ५१, कागलमधील ४८ आणि भुदरगडमधील २१ गावातील मतमोजणी सुरू झाली. राधानगरी तालुक्यात विरोधी आघाडीने साडेतीन हजाराहून अधिक मताधिक्क्य मिळेल अशी अपेक्षा केली होती. मात्र या ठिकाणी विरोधी आघाडीला मताधिक्कय कमी मिळाले.याउलट कागल आणि भुदरगड तालुक्यात सत्ताधारी आघाडीला मोठे मताधिक्क्य मिळाले. यामुळे प्रारंभापासूनच सत्ताधारी पॅनेल आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत १२० केंद्रावरील ३५ हजार ४८९ मतांची मोजणी झाली. या फेरीत सत्ताधारी आघाडीला ३८०० ते ४५०० पर्यंत मताधिक्क्य होते. दुसऱ्या फेरीत भुदरगडमधील ४२ व करवीरमधील ११ गावातील मिळून १४ हजार ४३१ मतांची मोजणी झाली.
सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विजयी उमेदवार
उत्पादक सभासद गट क्रमांक एक राधानगरी
राजेंद्र पांडूरंग पाटील सरवडे 27235, राजेंद्र पांडूरंग भाटळे राधानगरी 26823, राजेंद्र कृष्णाजी मोरे सरवडे 27767.
उत्पादक सभासद गट क्रमांक दोन राधानगरी
दीपक ज्ञानू किल्लेदार तिटवे 26876, दत्तात्रय श्रीपतराव पाटील मांगोली 26619, उमेश नामदेवराव भोईटे पालकरवाडी 27884.
उत्पादक गट क्रमांक तीन कागल
गणपती गुंडू फराकटे बोरवडे 27267, रणजित आनंदराव मुडूकशिवाले मळगे बुद्रुक 25999, सुनिलराज सुरेशराव सुर्यवंशी निढोरी 27126.
उत्पादक गट क्रमांक चार कागल
प्रविणसिंह विश्वनाथ पाटील मुरगूड 28552, रविंद्र आण्णासो पाटील 27438, रंगराव विठृठल पाटील सुरुपली 27438.
उत्पादक सभासद गट क्रमांक पाच भुदरगड
कृष्णराव परशराम तथा के. पी. पाटील मुदाळ 28693, मधुकर कुंडलिक देसाई म्हसवे 27127, राहूल बजरंग देसाई गारगोटी 27489, पंडितराव केणे गंगापूर 26942.
उत्पादक गट क्रमांक सहा भुदरगड
धनाजी रामचंद्र देसाई कडगाव 27845, सत्यजित दिनकरराव जाधव तिरवडे 29101, केरबा नामेदव पाटील पडखंडे 26995.
उत्पादक गट क्रमांक सात करवीर
संभाजीराव बापूसो पाटील कावणे 27384.
अनुसूचित जाती जमाती गट
रामचंद्र शंकर कांबळे निगवे खालसा 27926.
महिला गट
अरुंधती संदीप पाटील खानापूर २७४६७, रंजना आप्पासो पाटील म्हाकवे 26612.
इतर मागासवर्ग प्रतिनिधी गट
फिरोजखान जमालसो पाटील 27360
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष प्रवर्ग
रावसो सिद्राम खिलारे 28308
इतर महत्वाच्या बातम्या