(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : भीमा कृषी प्रदर्शन गुरुवारपासून; 12 कोटींचा रेडा अन् 31 लिटर दूध देणारी बिजली म्हैस चमकणार
Kolhapur News : शेतकऱ्यांना 'लोकल टू ग्लोबल' एकाच व्यासपीठावर वैविध्यपूर्ण माहिती देणारे भीमा कृषी प्रदर्शन गुरुवारी 26 जानेवारीपासून सुरु होणार आहे. हे प्रदर्शन रविवारी 29 जानेवारीपर्यंत असेल.
Kolhapur News : शेतकऱ्यांना 'लोकल टू ग्लोबल' एकाच व्यासपीठावर वैविध्यपूर्ण माहिती देणारे भीमा कृषी प्रदर्शन (Bhima Agriculture Exhibition) गुरुवारी 26 जानेवारीपासून सुरु होणार आहे. हे प्रदर्शन रविवारी 29 जानेवारीपर्यंत असेल. मेरी वेदर मैदानावर हे प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शानेच उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली.
भीमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीमधील प्रयोग, पशुपालन, कृषी उत्पादने यांची विविध दालने असतील, अशी माहितीही धनंजय महाडिक यांनी दिली. यावेळी महाडिक म्हणाले की, "कोरोनामुळे दोन वर्षे हे भीमा कृषी प्रदर्शन घेता आले नाही. मात्र, यंदा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ही पर्वणी उपलब्ध झाली आहे. प्रदर्शनात ड्रोन टेक्नॉलॉजीची माहिती देणारे दालन आहे. हे वर्ष मिलेटचे (तृणधान्य) वर्ष म्हणून घोषित केले. त्यानुसार प्रदर्शनात तृणधान्याचे प्रकार, उत्पादने, खाद्यपदार्थ यांची माहिती देणारे स्वतंत्र दालन येथे असणार आहे."
ते पुढे म्हणाले, "सेंद्रिय शेती, गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, मत्स्यपालन याचे प्रात्यक्षिक प्रदर्शनात पाहायला मिळेल. केळाच्या खोडापासून बनविलेले शर्ट आणि विविध उत्पादने प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. याशिवाय कृषी विकासात्मक शासकीय योजना, पौष्टिक तृणधान्ये लागवड, जमीन व्यवस्थापनाचे महत्त्व अशा विविध विषयांवर प्रदर्शनात चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
12 कोटींचा रेडा अन् 31 लिटर दूध देणारी बिजली म्हैस
दरम्यान, या प्रदर्शनामध्ये सुमारे 250 जनावरे असतील. यामध्ये म्हशी, रेडे, गायी, बैल, शेळ्या, कोंबड्या, परदेशी पक्षी प्रदर्शनात असतील. तब्बल 12 कोटी किंमतीचा जगातील सर्वांत उंच बादशाह रेडा आणि प्रतिलिटर 31 लिटर दूध देणारी बिजली म्हैस हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
महत्वाच्या इतर बातम्या :